जानेवारी महिना संपून फेब्रुवारी महिना सुरु झाला की, प्रेमीकांच्या दुनियेला वेध लागतात ते व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचे. त्यातही व्हॅलेंटाईन हा केवळ एका दिवसापूरता मर्यादीत नसतो बरं. तर तब्बल एक आठवडा तळ ठोकून असतो हा व्हॅलेंटाईन. तसाही तो अलिकडे जगप्रसिद्ध सण-उत्सवांपैकीच एक झाला आहे म्हणा. कदाचित म्हणूनच हा ठवडा व्हॅलेंटाईन सप्ताह म्हणून ओळखला जात असावा. व्हॅलेंटाईन विकमध्ये येणारे 7 दिवस वेगवेगळ्या 7 नावांनी साजरे केले जातात. अनुक्रमे हे दिवस रोज डे (Rose Day Significance), प्रपोज डे (Propose Day Significance), चॉकलेट डे (Chocolate Day Significance), टेडी डे (Teddy Day Significance), प्रॉमिस डे (Promise Day Significance), हग डे (Hug Day Significance), किस डे (Kiss Day Significance) आणि व्हॅलेंटाईन डे (Valentine Day Significance) या नावांनी ओळखले जातात. या दिवसाचेही वेगवेगळे असे खास महत्त्व आहे.
रोज डे (Rose Day)
जगभरात 7 फेब्रुवारी हा रोज डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीस खास करुन मुलगा किंवा मुलगीला गुलाबाचे फूल देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. या दिवसाच्या माध्यमातून गुलाबपूष्प देऊन आपण आपल्या नव्या दोस्तीची नवी सुरुवात करु शकता. तसेही कोणत्याही प्रेमाची सुरुवात ही मैत्रीतूनच होत असते. मैत्रीची सुरुवात करताना कधीही पिवळ्या रंगाचे फूल देणे इष्ट मानतात.
प्रपोज डे (Propose Day)
रोज डेच्या दुसरा दिवस म्हणजेच प्रोपोज डे. 8 फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी जगभरातील लोक व्हॅलेंटाईन साजरा करताना आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करतात. म्हणजेच समोरच्या व्यक्तीप्रती असलेली आपली प्रेमाची भावना त्याच्यासमोर व्यक्त करतात. तुम्ही जर आपल्या आवडत्या व्यक्तीला (मुलगा किंवा मुलगी) प्रपोज करु शकता.
चॉकलेट डे (Chocolate Day)
ज्यांच्या प्रेमाचे स्वागत झाले आहे असे लोक 9 फेब्रुवारी या दिवशी चॉकलेट डे साजरा करतात. या दिवशी आपल्या प्रेमाची नव्याने सुरुवात करत लोक चॉकलेट भरवतात. आपणही या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीस चॉकलेट देऊ शकता. (हेही वाचा, Valentine Week 2020 List: यंदा रोझ डे ते वेलेंटाइन डे 2020 ची संपूर्ण लिस्ट PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा आठवड्याभराचं रोमॅन्टिक सेलिब्रेशन!)
टेडी डे (Teddy Day)
व्हॅलेंटाईन सप्ताहात 10 फेब्रुवारी टेडी डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अनेक बॉयफ्रेंड्स आपल्या गर्लफ्रेंडला आपापल्या आर्थिक कुवतीनुसार छोटा किंवा मोठा टेडी बियर गिफ्ट करतात.
प्रॉमिस डे (Promise Day)
प्रॉमिस डे म्हणजे व्हॅलेंटाईन विकमधील पाचवा दिवस. हा दिवस 11 फेब्रुवारीला साजरा केला जातो. या दिवशी जोडपी आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याच्या आणाभाका घेतात. त्यासाठीच हा प्रॉमिस डे आहे.
हग डे (Hug Day)
प्रॉमिस डे संपल्यावर येतो तो म्हणजे हग डे. या दिवशी जोडीदाराची गळभेट घेतली जाते. स्पष्टच सांगायचे तर जोडीदाराला मिठीत घेतले जाते. हा दिवस जोडीदारासोबत आपल्या भावना अधिक जवळीकने व्यक्त करण्याचे माध्यम ठरतो.
किस डे (Kiss Day)
व्हॅलेंटाईन सप्ताहातील शेवटून दूसरा असतो तो किस डे. या दिवशी कपल एका वेगळ्याच उंचीवर असते. कपल एकमेकांना किस करते. एकमेकांप्रती असलेल्या भावाना या दिवशी अधिक उत्तेजीतपणे व्यक्त केल्या जातात. या भावना व्यक्त करण्यास कारण ठरतो किस.
वेलेंटाइन डे (Valentine Day)
अखेर शेवटी येतो तो वेलेंटाइन डे (Valentine Day) जो 14 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी कपल्स एकमेकांना लाल गुलाबाचे फूल देतात. रोज डे ला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर व्हॅलेंटाईन डेला मिळते. म्हणजेच लाल गुलाबाच्या फुलाचे उत्तर सकारात्मक मिळाले की, आपल्या प्रेमाचा जोडीदाराने स्वीकार केल्याचे पक्के होते. यानंतर कपल्स हे एकमेकांप्रती आदर, प्रेम आणि आपूलकीची भावना व्यक्त करतात.
व्हॅलेंटाईन डे आणि भारत असा विचार करु पाहता भारतात हा उत्सव साजरा करण्याची तशी पूरातन पद्धत नाही. अलिकडील काही वर्षांमध्ये हा उत्सव भारतात साजरा केला जातो. हा उत्सव पाश्चात्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. हा दिवस भारतात साजरा करण्यास काही संघटना राजकीय पक्ष विरोध करतात. पण, काळाच्या ओघात या संस्था, संघटनांचाही विरोध मावळल्याचे पाहायला मिळते.