Valentine's Week 2020 Calendar and Dates: फेब्रुवारी महिन्याला सुरूवात झाली की तरूणाईला व्हेलेंटाईन वीकचे (Valentine's Week) वेध लागायला सुरूवात होते. मग आज फेब्रुवारी महिन्याचा पहिला दिवस आहे. त्यामुळे यंदाचा व्हेलेंटाईन डे खास करायचा असेल तर तयारीला लागा. कारण 14 फेब्रुवारी दिवशी जरी व्हेलेंटाईन डे (Valentine’s Day) साजरा केला जाणार असेल तरीही त्याचं सेलिब्रेशन आठवडाभर आधीपासूनच सुरू होतं. त्यामुळे या सात दिवसांच्या सेलिब्रेशनसाठी सज्ज होण्यासाठी पहा यंदा व्हेलेंटाईन विकमध्ये कोणत्या दिवशी कोणते सेलिब्रेशन असेल. रोझ डे (Rose Day) पासून सुरू होणारा व्हेलेंटाईन विक आठवड्यातील प्रत्येक एका दिवसासाठी खास असतो. यामध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड एकमेकांसाठी प्रत्येक दिवसाला खास करण्यासाठी स्पेशल सेलिब्रेशनदेखील करतात. मग तुम्ही देखील तुमच्या आयुष्यातील 'त्या' खास व्यक्तीसाठी हा दिवस स्पेशल करणार असाल तर पहा यंदा कोणत्या दिवशी आहे Rose Day 2020, Kiss Day 2020 ते Propose Day 2020. यंदाच्या व्हेलेंटाईन विकच्या आठवड्याभराचं सेलिब्रेशनचं संपूर्ण वेळापत्रक PDF स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
तिसऱ्या शतकात रोम देशात एक क्रुर सम्राट होता. जो प्रेम करणाऱ्या युगुलांवर अत्याचार करत असे. मात्र त्याच्या अत्याचारा न जुमानता व्हेलेंटाईन नावाच्या एका संताने प्रेमाचा संदेश दिला. त्याच्या या कृत्यानिमित्त व्हेलेंटाईनला जेलमध्ये टाकण्यात आले आणि 14 फेब्रुवारी 270 साली त्याला फासावर लटकवण्यात आले. संत व्हेलेंटाईन यांनी प्रेमासाठी दिलेल्या या बलिदानाची आठवण म्हणून प्रत्येक वर्षी 14 फेब्रुवारीला 'व्हेलेंटाईन डे' साजरा केला जातो.
Valentine's Day 2020 चं संपूर्ण वेळापत्रक
7 फेब्रुवारी 2020 - रोझ डे
8 फेब्रुवारी 2002 - प्रपोझ डे
9 फेब्रुवारी 2020 - चॉकलेट डे
10 फेब्रुवारी 2020 - टेडी डे
11 फेब्रुवारी 2020- प्रॉमिस डे
12 फेब्रुवारी 2002 - हग डे
13 फेब्रुवारी 2020 - किस डे
14 फेब्रुवारी 2020 - व्हॅलेंटाईन डे
रोझ डे (Rose Day)पासून व्हेलेंटाईन डे (Valentine’s Day) पर्यंत सारा आठवडा रोमॅन्टिक करण्यासाठी आजपासूनच खरेदी आणि सरप्राईज प्लॅन करायला सुरूवात करा. व्हेलेंटाईन डे च्या निमित्ताने सार्या बाजारपेठा सजलेल्या असतात. त्यामुळे प्रत्येक दिवस खास करण्यासाठी तुमच्या साथीदाराची आवड निवड लक्षात ठेवून त्यानुसार गिफ्ट्सची निवड करा.