Tripurari Pournima 2022: कार्तिक पौर्णिमेचे महत्व आणि धनप्राप्तीचे उपाय
देव दीपावली किंवा त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त सारा परिसर दिव्यांच्या झगमगाटाने उजळून निघतो. मग जाणून घ्या या दिवशी काय केल्यास लक्ष्मीमाता प्रसन्न होते?
दिवाळीच्या धामधूमीनंतर येणारी कार्तिक महिन्यातील पौर्णिमा ही हिंदू धर्मियांसाठी खास असते. कार्तिक पौर्णिमा ही त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते. यंदा कार्तिक पौर्णिमा 8 नोव्हेंबर दिवशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी उत्तर भारतीय देव दीपावली देखील साजरी करतात. पवित्र नदी मध्ये डुबकी मारण्याची देखील प्रथा पाळली जाते. दान करून सत्यनारायणाची पूजा करण्याची, सत्यनारायणाची कथा ऐकण्याची रीत आहे. देव दीपावली किंवा त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त सारा परिसर दिव्यांच्या झगमगाटाने उजळून निघतो.
कार्तिक पौर्णिमा का असते महत्त्वाची?
कार्तिक पौर्णिमेला भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या एका राक्षसाचा वध केला होता. अशी पुराणकथा आहे. या राक्षसाच्या वधानंतर भगवान श्री शंकर यांची ओळख त्रिपुरारी झाली. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक पूजेचे सुद्धा महत्व आहे. ते सहा कृत्तिकांचे प्रिय पुत्र होते, अशी धारणा आहे. शिवा, संभूती, संतती, प्रीती, अनुसया व क्षमा नावाच्या कृत्तिकांचे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पूजन केल्यास भगवान शंकर व त्यांच्या परिवाराची कृपा आपल्यावर राहते. या दिवशी भगवान शंकर, पार्वती आणि कार्तिकेय व श्रीगणेशाची पूजा केल्यास घरात सुख, शांती आणि समृध्दी नांदते. नक्की वाचा: Dev Diwali 2022: आज देव दिवळी! त्रिपुरारी पौर्णिमेला का साजरी केली जाते देव दिवाळी? जाणून घ्या हिंदू संस्कृतीतील देव दिवळीचं महत्व .
कार्तिक पौर्णिमेदिवशी धनलाभ व्हावा म्हणून काय कराल?
- कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरासह माता पार्वती व कार्तिकेय यांची मनोभावे पूजा करा. हा दिवस कार्तिकेयाचा जन्म दिवस असतो असे देखील मानले जाते.
- कार्तिक पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करा, यामुळे घरात सुख, शांत आणि समृद्धी नांदण्यास मदत होते.
- पौर्णिमेच्या दिवशी गरिब व्यक्तीला पांढऱ्या वस्त्रासह दूध, मिठाई व तांदूळ यांचे दान करा. त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते.
- लक्ष्मी सोबतच चंद्रास तांदळाच्या खीरीचा नैवेद्य दाखवा यामुळे माता लक्ष्मी चा आशिर्वाद कायम राहतो.
- पिंपळाच्या झाडाची पूजा करा.उत्तर भारतामध्ये कार्तिक पौर्णिमा या दिवशी देव दिवाळीही साजरी केली जाते. दिवाळीप्रमाणे घर सजवले जाते. दिवे लावले जातात. यामुळे लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला कधीही पैशांची कमी भासणार नाही. अशी हिंदू धर्मियांची धारणा आहे.
टीप- वरील लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला आहे. यामधील माहितीची लेटेस्टली पुष्टी करत नाही. अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही.
(The above story first appeared on LatestLY on Nov 07, 2022 01:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

