आज देव दिवाळी (Diwali). हिंदू संस्कृतीत (Hindu Tradition) देव दिवाळीला विशेष महत्व आहे. आजचा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्याची परंपरा आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) वाराणसी (Varanasi) या पवित्र शहरात म्हणजेचं शिवशंभोच्या काशी नगरीत दरवर्षी देव दिवाळी धुमधडाक्यात साजरी केली जाते. कार्तिक पौर्णिमेच्या (Kartik Pournima) दिवशी देव दिवाळी साजरी केल्या जाते. त्रिपुरासुर राक्षसावर भगवान शिवाच्या विजयाची आठवण म्हणून देव दिवाळी साजरी करण्यात येते अशी आख्यायिका आहे. म्हणून देव दिवाळीच्या उत्सवाला त्रिपुरोत्सव किंवा त्रिपुरारी पौर्णिमा (Tripura Pournima) असेही म्हणतात. पण यावर्षी दिवाळी प्रमाणेचं देव दिवाळीवरही चंद्रहणाची सावली पडली आहे. उद्या चंद्रग्रहण (Lunar Eclipse) असल्या कारणाने त्रिपूरा पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच उद्या देव दिवाळी साजरी न करता ती आजचं साजरी केल्या जाणार आहे.
हिंदू संस्कृतीनुसार, तारकासुर या राक्षसाला तीन पुत्र होते - तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमलाक्ष - त्रिपुरासुर म्हणून ओळखले जाते. त्यांच्या कठोर तपश्चर्येने त्रिपुरासुराने ब्रह्मदेवाला प्रभावित केले आणि अमरत्व मागितले. तथापि, भगवान ब्रह्मदेवाने त्यांना वरदान दिले की त्यांना फक्त एका बाणाने मारले जाऊ शकते. आशीर्वाद मिळाल्यानंतर त्रिपुरासुराने सर्वनाश केला आणि मोठ्या प्रमाणावर संहार केला. त्यांचा पराभव करण्यासाठी भगवान शिवाने त्रिपुरारी किंवा त्रिपुरांतक अवतार घेतला आणि एकाच बाणाने तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमलाक्ष या तिघांनाही ठार केले. (हे ही वाचा:- Tulsi Vivah 2022 Messages: तुळशीच्या लग्नाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Messages द्वारा शेअर करत साजरा करा आजचा मंगल दिवस!)
देव दिवाळीच्या दिवशी नदीत आंघोळ केल्यास विशेष पुण्य लाभते. तर दिवाळी प्रमाणेचं आज म्हणजे देव दिवाळीला दिवे लावले जातात. तरी शिवाच्या काशी नगरीत आजच्या दिवशी महाशिवपूजा केली जाते. कोरोनाच्या पार्श्वभुमिवर आज तब्बल दोन वर्षानंतर देव दिवाळी साजरी करण्यात येणार आहे म्हणून उत्तर प्रदेश सरकारकडून गंगेकाठी विविझध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.