Swami Vivekananda Death Anniversary 2019: स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) यांचा जन्म 1863 साली बंगालमध्ये झाला. मूळचे बंगालचेअसले तरीही कट्टर हिंदू विचारवंत असलेल्या स्वामीजींनी रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्त्व पत्करून त्यांचे संदेश आणि विचार देशा-परदेशात पोहचवण्याचे काम केले. रामकृष्ण मिशनची स्थापना करून त्यांनी या कार्याला सुरूवात केली. 4 जुलै या दिवशी त्यांनी समाधी घेऊन या जगाचा निरोप घेतला. रामकृष्णांच्या सहवासात असलेल्या स्वामी विवेकानंदांमध्ये आमूलाग्र बदल झाले. त्यांच्यासह असलेल्या अन्य तरुण साधकांनी रामकृष्णांच्या आदर्शांना स्वीकारून काशीपूरच्या उद्यानात तपश्चर्या केली आणि यामधूनच रामकृष्ण संघाची पायाभरणी झाली.
स्वामी विवेकानंदांनी कशी आणि कुठे घेतली समाधी?
स्वामी विवेकानंद यांनी 4 जुलै 1902 दिवशी कोलकत्ता नजिक बेलूर मठ येथे समाधी घेतली. स्वामी विवेकानंदांनी आपण किती वर्ष जगणार याची भविष्यवाणी पूर्वीच केली होती. त्यानुसार वयाच्या 40 शी पूर्वी त्यांनी जगाचा निरोप घेतला. कालांतराने त्यांच्या स्मरणार्थ विवेकानंद केंद्र संस्थेच्या पुढाकाराने 'विवेकानंद स्मारक' उभारण्यात आलं. आयुष्यात प्रेरणा आणि बळ देणारे स्वामी विवेकानंदांचे सकारात्मक विचार!
स्वामी विवेकानंदांचे विचार
-
स्वामी विवेकानंदांच्या मते सर्व प्राणिमात्र शिवाचे अंश आहेत, त्यामुळे 'शिवभावे जीवसेवा' हे रामकृष्ण यांचे वचन आयुष्यभर पाळले.
- प्रत्येक जीव हा मूळ रूपातच ईश्वरी आणि दैवी आहे.
- अंतर्गत आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून त्याच्यातील दैवी अंशास जागृत करणे हे आपले ध्येय आहे.
- कर्म,पूजा किंवा मानसिक नियंत्रण किंवा तत्त्वज्ञान यापैकी एक किंवा अनेक मार्गांचा उपयोग करून मुक्ती मिळवली पाहिजे.
- उठा, जागे व्हा, आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.
स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव नरेंद्र होते. राजा अजितसिंग खेत्री यांनी 10 मे 1893 ला स्वामीजींना 'विवेकानंद' असे नाव दिले. आजही तरूणांना स्वामींचे विचार प्रेरणादायी आहेत.