आज भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. सकाळी अनेक ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला आहे. यंदा कोविड 19 संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिन सोहळा व्हच्युअली साजरा केला जात आहे. भारताच्या प्रजासत्ताक दिना निमित्ताने राजपथावर आयोजित परेड सोहळ्यातही मर्यादित लोकांना उपस्थित राहण्याची मुभा देत उर्वरित भारतीयांना हा सोहळा लाईव्ह पाहण्यासाठी टेलिव्हिजन, अॅप द्वारा खास लिंक शेअर करण्यात आली होती. दरम्यान प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सणांपैकी एक असल्याने गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्याचा सोहळा आज साजरा होणार. पण यामध्ये तुमच्याकडून राष्ट्रध्वजाचा कुठे अपमान तर होत नाही ना? याची देखील काळजी घेणं आवश्यक आहे. नक्की वाचा: Republic Day 2021 Quotes & Slogans: स्वातंत्र्यसेनानींची घोषवाक्य, देशभक्तीपर मेसेजेस, संदेश शेअर करत साजरा करा यंदाचा गणतंत्र दिवस!
ध्वजारोहणानंतर ध्वज उतरवताना देखील विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. देशाची राष्ट्रभक्ती व्यक्त करताना जसा उंचावर डौलाने फडकणारा राष्ट्रध्वज आपली मान उंचावतो तशीच खराब झालेल्या, फाटलेल्या, मळलेल्या राष्ट्रध्वजाला देखील सन्मानपूर्वक निरोप देणं गरजेचे आहे. The Flag Code if India, 2002 च्या नियमांनुसार, राष्ट्रधवजाला निरोप देताना तो जाळला किंवा पुरला जातो.
पुरण्याची नियमावली
तुम्हांला भारताचा तिरंगा पुन्हा वापरता येईल अशा स्थितीत नसल्याचं आढळल्यास तो पुरण्याचा मार्ग तुमच्याकडे आहे. याकरिता सुरूवातीला तो नीट घडी करून एका लाकडाच्या डब्यात ठेवा नंतर तो डबा पुरा. यावेळी त्या ठिकाणी शांतता बाळगणं आवश्यक आहे.
जाळण्याची नियमावली
ध्वज जाळण्यासाठी एखादी योग्य जागा निवडून ती स्वच्छ करा. झेंड्याची घडी घाला. आग लावल्यानंतर जाळेच्या मध्यभागी झेंडा टाका. झेंडा सन्मानपूर्वक जाळा. त्यानंतर काही काळ या प्रसंगी मौन, शांतता पाळा.
दरम्यान तुम्हांला रस्त्यावर फाटलेल्या अवस्थेमध्ये झेंडा फाटलेल्या अवस्थेमध्ये आढळला तर त्याची नीट विल्हेवाट लावा किंवा तो जिल्हाधिकारी कार्यालयात, संबंधित एनजीओ मध्ये द्या. त्यांच्याकडून योग्यरित्या झेंड्यांची सन्मानपूर्वक विल्हेवाट लावली जाईल.