
यंदा 26 जानेवारीला भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा केला जाणार आहे. 26 जानेवारी 1950 दिवशी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेद्रप्रसाद यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून जाहीर केले. त्यावेळी 21 गोळ्यांची सलामी देत त्याची नांदी झाली होती. दरम्यान 150 वर्ष भारतावर राज्य केलेल्या ब्रिटिशांची सत्ता उलथून लावल्यानंतर स्वातंत्र्यानंतर भारत देशामध्ये नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला होता. पण हा संघर्ष रक्तरंजित होता. अनेकांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून प्राणांची आहुती दिली. काहींनी आपल्या विचारांनी, वकृत्त्वाने समाजाला प्रबोधित करून ब्रिटीशांविरूद्ध उभं राहण्यास प्रवृत्त केले. त्यावेळी स्वातंत्र्यसेनानींनी दिलेल्या या घोषणा आजही भारतीयांची छाती अभिमानाने फुलून येणार्या आहेत. Republic Day 2021 Messages in Marathi: प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा Wishes, Images, WhatsApp Stickers द्वारे देऊन साजरा करा राष्ट्रीय सण!
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेल्या 'जय हिंद' हा नारा आज राष्ट्रीय नारा बनला आहे. तर भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा दिलेला नारा आजही महत्त्वाचा आहे. दरम्यान या दोन घोषवाक्यांसोबतच इतही काही महत्त्वाच्या घोषणा तुमची छाती नक्कीच अभिमानाने फुलेल. मग या काही घोषवाक्यांनी यंदाचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा करा.






भारतामध्ये यंदा प्रजासत्ताक दिनी देखील कोविड 19 चा प्रभाव असल्याने सेलिब्रेशनवर मर्यादा घालण्यात आली आहेत. पण ऑनलाईन सेलिब्रेशन द्वारा हा गणतंत्र दिवस साजरा करू शकता.