Happy Republic Day 2021 Marathi Messages: पारतंत्र्यापूर्वी भारतात राजेशाही होती. ब्रिटीश काळातही संस्थानांच्या रुपाने राजेशाही नांदत होतीच. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर राज्यव्यवस्थेची जागा लोकशाहीला घ्यायची होती. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'घटना' तयार केली. ही राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणली गेली. तेव्हापासून 26 जानेवारी हा दिवस 'प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा केला जातो. हा एक राष्ट्रीय सण असून यानिमित्ताने देशवासिय एकमेकांना शुभेच्छा देतात. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी शुभेच्छापत्रं, Wishes, Messages, Greetings, Images. सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram), टेलिग्राम (Telegram) यावरुन शेअर करुन तुम्ही या दिवसाचा आनंद अधिक वाढवू शकता.
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत पंतप्रधान, राष्ट्रपती, अन्य मंत्री, महत्त्वाच्या व्यक्ती यांच्यासमवेत भव्य कार्यक्रम होतो. यासाठी परदेशी पाहुणे देखील उपस्थित राहतात. शूर सैनिकांना शौर्य पदके दिली जातात. तिन्ही दलांचे संचलन पार पडते. सांस्कृतिक कार्यक्रमांसह देशातील विविध राज्यातील चित्ररथाची मिरवणूक विशेष असते. (Republic Day Parade 2021: यंदा भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन; परेड वेळ, ठिकाण यासह जाणून घ्या कुठे पाहाल Live)
प्रजासत्ताक दिन 2021 शुभेच्छा!
एक देश, एक स्वप्न
एक ओळख, आम्ही भारतीय..!
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
देश विविध रंगाचा,
देश विविध ढंगाचा,
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,
प्रजासत्ताक दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
उत्सव तीन रंगांचा,
आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांचा
ज्यांनी हा भारत देश घडवला
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग, रूप, वेष, भाषा
जरी अनेक
भारत देशाचे निवासी सगळे आहेत एक
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
तीन रंग प्रतिभेचे
नारंगी,पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणे किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
WhatsApp Stickers च्या माध्यमातून द्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा:
सण समारंभ यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आजकाल WhatsApp अगदी सर्रास वापरले जाते. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही तुम्ही व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या माध्यमातून देऊ शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जा आणि व्हॉट्सअॅप स्टिकर्स डाऊनलोड करुन तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळींना पाठवा.
प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये, संस्था, रहिवासी सोसायट्या यामध्ये ध्वजवंदनाचा कार्यक्रम होते. तसंच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन केले जाते. प्रजासत्ताक दिन भारतभर अगदी आनंदाने आणि अभिमानाने साजरा केला जातो. परंतु, यंदा कोविड-19 चे संकट असल्यामुळे विशेष खबरदारी घेऊनच कार्यक्रमाचा आनंद घ्या. तुम्हा सर्वांना लेटेस्टली मराठी कडून प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा!