Ramadan 2022 Tradition: रमजानचा उपवास सोडताना खजूरचे सेवन का करतात? घ्या जाणून

भारतात  शनिवारपासून (2 एप्रिल) रमजानचा पवित्र महिना सुरू झाला आहे. रमजानचा कालावधीमध्ये प्रार्थना करणे, अल्लाहशी संपर्क साधणे, पारंपारिक जेवण तयार करणे, घर सजवणे आणि धार्मिक विधींनुसार उपवास करणे इ. गोष्टी केल्या जातात. खजूर खाऊन उपवास सोडावा असे म्हणतात. रमदान काळात खजूर खाण्यास विशेष महत्त्व दिले जाते. हे महत्त्व का आहे? घ्या जाणून.

खजूर खाण्याचे महत्व 

खजूरमध्ये भरपूर फायबर, पोटॅशियम आणि कॅल्शियमचा स्रोत असते. हदीस साहित्यात असा उल्लेख आहे की अल्लाहचा दूत प्रार्थना करण्यापूर्वी पिकलेल्या खजुरांनी उपवास सोडत असे. विशेष म्हणजे, चवीला चांगली असण्यासोबतच, खजूरमध्ये खरोखरच उपचारात्मक गुणधर्म असतात, विशेषत: जेव्हा उपवासाचा प्रश्न येतो. खजूरमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण असते, जे दिवसभर आपली भूक नियंत्रित करण्यास मदत करते. खजूर पचायला सोप्या असतात त्यामुळे जास्त वेळ उपवास केल्यावर पोट दुखत नाही.

इफ्तारच्या वेळी खजूर खाल्ल्याने पोट लगेच भरते आणि उपवास सोडल्यानंतर आपण घाईघाईने जास्त अन्न खाणार नाही, ज्यामुळे पचनाचे विकार आणि भविष्यात आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. खजूरमध्ये आढळणारे पोषक घटक उर्जेचा स्रोत प्रदान करण्यास मदत करतात. त्यामुळे पवित्र महिन्यात लोक खजूर खाण्यास प्राधान्य देतात.