Winter Special Superfood: हिवाळ्यातील तुमच्या आहारात समाविष्ट करा हा सुकामेवा, जाणून घ्या काय होईल फायदा
Benefits Of Dry Fruit | (Photo Credits: Twitter/ANI)

Winter Diet: हिवाळा ऋतू अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरतो. खास करुन आरोग्याच्या आणि आहाराच्या दृष्टीने या ऋतूचे वेगळे महत्त्व आहे. थंडीच्या दिवसामध्ये पचनक्रिया अधिक वेगवान होते. त्यामुळे थंडीच्या काळात लोक व्यायाम करण्यावर अधिक भर देतात. प्रामुख्याने थंडीच्या दिवसामध्ये शरीराला उष्णता आणि आवश्यक उर्जा देण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात. त्यातच तापमानही मोठ्या प्रमाणावर कमी होते. त्यामुळे अशा काळात पौष्टीक आहारावर (Winter Special Superfood) भर द्यावा लागतो. पौष्टीक आहारात आपण सुकामेवा म्हणजेच ट्रायफ्रूट्स नक्कीच वापरू शकता. जाणून घ्या असे कोणते ड्रायफ्रूट्स (Benefits Of Dry Fruit) आहेत. जे आपण थंडीत आहारात घेऊ शकता आणि त्याचा कसा फायदा होऊ शकतो.

हिवाळ्यात ड्रायफ्रूड्स खाण्याचा फायदा

सूकामेवा म्हणजेच ड्रायफ्रूट्स सामान्यत: हिवाळ्यात खाल्ले जातात कारण ते उष्ण गुणधर्माचे असतात आणि ते तुम्हाला उबदार ठेवू शकतात. जेणेकरुन हिवाळ्यात होणार्‍या आजारांपासून तुमची प्रतिकारशक्ती वाढवू शकतात. उर्जा, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि इतर आवश्यक पोषक तत्वे तुमच्या शरीरासाठी सुक्या मेव्यांद्वारे पुरवली जातात.

अनेक लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांना ड्रायफ्रूट्स खाण्याचा सल्ला दिला जातो. ड्रायफ्रूट हे तळलेल्या पदार्थांना पर्याय म्हणून वापरले जातात. त्यातच त्याचे इतरही पौष्टीक अनेक फायदे असतात. ज्यात संक्रमणांशी लढण्याची क्षमता, प्रतिकारशक्ती वाढवणे आणि पचनशक्ती वाढवणे यांचा समावेश आहे.

मनुका (Raisins )

मनुका म्हणजे ही सुकवलेली द्राक्षे असतात. ज्यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. ज्यांना गोड चव आवडते त्यांच्यासाठी ते एक मेजवानी आहेत. कारण ते नैसर्गिकरित्या गोड आणि उच्च कॅलरीयुक्त आहेत. हे पचन सुलभ करते आणि त्यात फायबर असते, जे हानिकारक कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते.

खजूर (Dried Dates)

भारतातील बहुतेक घरांमध्ये खजूर हे सुपरफूड आहे. खजूरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि इतर पोषक घटक असतात जे तुमचे आरोग्य सुधारू शकतात आणि ते कच्चे खाल्ले जातात किंवा मिठाईमध्ये वापरले जातात. वाळलेल्या खजूरमध्ये आढळणारे पॉलीफेनॉल मधुमेहावर गुणकारी असते. चांगले पचन करण्यास मदत खजूरची मदत होते.

पिस्ता (Pista)

भारत आपल्या स्वादिष्ट पिस्त्यासाठी ओळखला जातो. पोटॅशियम आणि हेल्दी फॅट, पिस्त्यामध्ये मुबलक प्रमाणात असते. त्यात दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंटचा प्रभाव असतो. जे तुमच्या हृदयासाठी चांगले आहे. पिस्ता आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

काजू Kaju)

काजू हे अनेक आरोग्यसाठी फायदेशीर आणि पौष्टिक आहेत. त्यात मॅग्नेशियम, तांबे आणि मॅंगनीजचे प्रमाण जास्त असते, जे मेंदूचे कार्य, हाडांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्तीला समर्थन देतात. त्यात अँटिऑक्सिडंट्स देखील असतात, जे रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात.

बदाम (Almond)

बदाम स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात हे सर्वज्ञात सत्य आहे. रात्रभर भिजवल्यानंतर सकाळी त्यांचे सेवन केल्याने संज्ञानात्मक कार्यक्षमता सुधारू शकते. ते व्हिटॅमिन ई मध्ये समृद्ध आहेत, जे वृद्ध लोकांच्या स्मृतींना मदत करते आणि त्यांना स्मृतिभ्रंश होण्याचा धोका कमी करते.