रमजानचा पाक महिना सुरू आहे. इस्लामिक कॅलेंडरमधील हा नववा महिना आहे, जो सर्वात पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात मुस्लीम बांधवांसाठी ज्याप्रमाणे प्रार्थनेला विशेष महत्व आहे, तसेच महत्व रोजा ठेवण्यालाही आहे. या महिन्यात अल्ला कुराणच्या पहिल्या वचनात प्रकट झालाअसा मुस्लिमांचा विश्वास आहे. पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत मुस्लिम उपवास करतात ज्याला रोजा असं म्हणतात. महिना हा आध्यात्मिक शिस्तीचा आणि अल्ला बरोबरच्या नातेसंबंधावर चिंतनाचा काळ आहे. सूर्योदयाच्या अगोदर काही खातात, ज्याला सेहरी (Sehri) म्हणतात. त्यानंतर दिवसभर कडक उपवासानंतर रात्री सूर्यास्तनंतर उपवास सोडतात ज्याला इफ्तारी (Iftar) म्हणतात. पहाटेपासून रात्री पर्यंत दररोज वेळा पाच प्रार्थना केल्या जातात. त्यांना म्हणतात: फजर (पहाट), धुहर (दुपार), आसर (दुपार), माघरीब (संध्याकाळी) आणि ईशा (रात्री). प्रत्येक मुस्लिमानाने उपवास ठेवणे महत्वाचे मानले जाते. (Simple Mehndi Designs For Eid 2020: रमजान ईद च्या निमित्ताने यंदा हाता-पायावर झटपट मेहंदी काढण्यासाठी आयडिया देतील हे लेटेस्ट ट्रेन्डस)
दरम्यान, सध्या जगभरात कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे सामुदायिक प्रार्थना रद्द केल्या आहेत. लोक आपापल्या घरीच कुराणचे पठन, रोजा ठेवणे, प्रार्थना करणे अशी धार्मिक कृत्ये करत आहेत. रमजान महिन्यात दोन गोष्टी सर्वात महत्वाच्या असतात, पहिली म्हणजे सहरी आणि दुसरी इफ्तार. या पवित्र महिन्याच्या काळात जाणून घ्या राज्यातील महत्वाच्या शहरांमधील उद्या, 19 मेच्या सेहरी आणि इफ्तारच्या वेळा.
> मुंबई -
सेहरी वेळ - 04:42
इफ्तार वेळ - 19:08
> पुणे -
सेहरी वेळ - 04:39
इफ्तार वेळ - 19:06
> कोल्हापूर -
सेहरी वेळ - 04:42
इफ्तार वेळ - 19:02
> औरंगाबाद -
सेहरी वेळ - 04:30
इफ्तार वेळ - 19:03
> नागपूर -
सेहरी वेळ - 04:12
इफ्तार वेळ - 18:49
> नाशिक -
सेहरी वेळ - 04:36
इफ्तार वेळ - 19:09
रमजान महिन्यात उपवास (रोजा) ठेवणे हे मुस्लिमांसाठी प्रवित्र मानले जाते. महिनाभर उपवास ठेवणे म्हणजे देवावर विश्वास ठेवणे आणि त्याची उपासना करणे. रमजानचा महिना हा संयम, त्याग, शांती, सहिष्णुता, चांगुलपणा, प्रामाणिकपणा माणसांच्या ठायी रुजविणारा हा महिना आहे. या काळात मुस्लीम बांधव सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींपासून दूर राहतात. नमाज, रोजे, प्रार्थना, कुराणचे वाचन अशा पवित्र वातावरणात हा महिना व्यतीत केला जातो. याच महिन्यातहजरत मुहम्मद पैगंबरांना त्यांच्या अखंड साधनेचे, खडतर तपश्चर्येचे फळ म्हणून अल्लाहचे दर्शन झाले, अशीही मान्यता आहे.