Just Mehndi (Photo Credits: Just Mehndi, F Sheth Mehndi Designs YouTube)

Mehndi Designs Ideas for Eid 2020:  मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना म्हणजेच रमाजान महिन्याची सांगता रमजान ईदने होते. मुस्लीम समुदयासाठी रमजान ईदचं विशेष महत्त्व असतं. या दिवशी गोडाचे पदार्थ बनवून, नवीन कपडे घालून एकमेकांसोबत आनंद शेअर केला जातो. दरम्यान या दिवशी महिला, लहान मुली हातावर मेहंदी काढतात. इतर धर्मियांप्रमाणे सेलिब्रेशनच्या दिवशी हातावर मेहंदी काढण्याला वेगळं महत्त्व देखील आहे. जसे फॅशनमध्ये ट्रेंड्स बदलतात तसेच आता बदलत्या काळानुसार मेहंदीच्या डिझाईन्समध्येही बदल होत आहे. यंदा रमजान ईद लॉकडाऊनमध्ये आल्याने अनेकांना मेहंदी काढण्यासाठी बाहेर जाता येणार नाही. पण यंदा तुम्ही घरच्या घरी काही लहान सहान ट्रिक्स वापरून झटपट मेहंदी काढू शकता. यासाठी अनेक व्हिडीओ तुम्हांला ऑनलाईन उपलब्ध आहेत.

ईद-ए-मिलाद हा सण मुस्लीम धर्मीयांचे 'अल्लाह' चे प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. महिनाभर रोझा म्हणजेच उपवास पाळून रमजानच्या पवित्र महिन्यात देवाकडे सुख, समृद्धीची प्रार्थना केली जाते. मग यंदा हा सण जरी घरातच राहून साजरा करायचा असला तरीही लॉकडाऊन आणि होम क्वारंटीन मुळे आलेली मरगळ दूर करण्यासाठी, तुमचा मूड बदलण्यासाठी हातावरची मेहंदी तुम्हांला मदत करू शकते. मग पहा यंदा ईद-उल-फित्रच्या निमित्ताने कोण कोणत्या प्रकरच्या अरेबिक स्टाईल मेहंदी हातावर काढू शकता?

 ज्वेलरी  मेहंदी डिझाईन

साधी सोपी मेहंदी डिझाईन

स्टायलिस्ट मेहंदी डिझाईन

अरेबिक स्टाईल मेहंदी डिझाईन

यंदा ईद 23 मे पासून सुरू होऊन  24 मे पर्यंत साजरी केली जाऊ शकते. दरम्यान चंद्रकोर कोणत्या दिवशी कुठे दिसेल यावर ईदच्या सेलिब्रेशनची नेमकी तारीख ठरते. दरम्यान दरवर्षी ईदला नवे कपडे, दागिन्यांचा साज शृंगार असतो. अनेक महिला हाताप्रमाणेच पायांवरही मेहंदी काढतात. मग यंदा तुमचा काय प्लॅन आहे? हे आम्हांला नक्की सांगा आणि तुमचे मेहंदीचे फोटो   आमच्यासोबत नक्की शेअर करा.