जगभरातील मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना म्हणजे रमजान. इस्लामिक कॅलेंडरनुसार रमझान हा नववा महिना असून या महिन्यात 'रोझा' म्हणजे दिवसभराच्या विशेष उपवासाचं महत्त्व असतं. रोझा ठेवणार्यांना दिवसभर अन्न-पाण्याचा थेंबही घेण्याची परवानगी नसते. दरम्यान रमझान महिना हा मुस्लिम बांधवांना स्वयंशिस्त, संयम शिकवतो. या पवित्र महिन्यात इस्लामिक धर्मियांवर विशिष्ट बंधनं असतात. 'रोझा' ठेवणं हे इस्लाम धर्मातील 5 प्रमुख तत्त्वांपैकी एक आहे. मग यंदा तुम्ही देखील रोझा ठेवणार असाल तर जाणून घ्या नेमक्या कोणत्या गोष्टी रमझानच्या महिन्यात करण्याची परवानगी असते आणि कोणत्या गोष्टी वर्ज्य असतात? Ramzan Mubarak 2020 Wishes & Greetings: रमजान उल करीम उत्सवाला लवकरच होणार सुरुवात; WhatsApp Status, HD Images आणि Stickers च्या माध्यमातून सर्वांना द्या या खास शुभेच्छा.
येत्या काही दिवसात जगभरात रमझान महिन्याला सुरूवात होईल. पण या पवित्र महिन्यावर कोरोना व्हायरसचं संकट आहे. त्यामुळे नागरिकांना घरीच बसून आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत रमझान महिना, रोझा पाळण्याचं आवाहन अमेरिका, भारत सह जगभरातील मुस्लिम बांधवांना करण्यात आलं आहे. Ramadan 2020 Date in India: भारतामध्ये रमझान महिन्याला यंदा सुरूवात कधी होणार?
रमजान महिन्यात कोणत्या गोष्टींना परवानगी?
- मुस्लिम बांधव 'रोझा' ठेवत असतील तर ते सुर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर अन्नग्रहण करू शकतात.
- पहाटे सूर्यादयापूर्वीच्या जेवणाला 'सेहरी' म्हणतात तर सूर्यास्तानंतरच्या जेवणाला 'इफ्तार' म्हणतात.
- जर एखादी व्यक्ती आजारी पडली तर ती 'रोझा' टाळू शकते. प्रकृती ठीक झाल्यानंतर पुन्हा 'रोझा' सुरू करता येऊ शकतो.
- लांब प्रवास करणार्यांनाही प्रवासात शक्य नसेल तर रोझा टाळता येतो. नंतर पुन्हा उपवास सुरू करता येतो.
- गरोदर महिलांना उपवास ठेवण्याची सक्ती नसते. त्यांना गरोदरपणाच्या काळात रोझा ठेवण्याच्या प्रथेमधून मुभा मिळू शकते. प्रकृती स्थिर झाल्यानंतर रोझा पुन्हा ठेवला जाऊ शकतो.
रमजान महिन्यात कोणत्या गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो?
- सेहरी आणि इफ्तारच्या दरम्यान अन्न-पाणी घेणं न घेण्याचा नियम आहे.
- व्रतच्या काळात सेक्स न करण्याचा सल्ला दिला जातो.
- धुम्रपान, मद्यपान करू नये.
- रोझाच्या काळात टुथपेस्टचा वापर करू नये.
- इतरांना नुकसानकारक ठरतील अशा विनाशी, घातक कृती, विचार टाळावेत.
भारतामध्ये सध्या 3 मे पर्यंत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळे रमजान महिन्यातील इफ्तार पार्ट्या, सेलिब्रेशन सह मशिदीमध्ये जाऊन नमाज अदा करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. यंदा रमजान महिन्यात घरच्याघरीच सेलिब्रेशन करून प्रार्थनादेखील करावी. कटाक्षाने सामुहिक कार्यक्रम टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.