![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2024/04/6-Eid-Msg-380x214.jpg)
मुस्लिम बांधवांसाठी रमजान ईद (Ramadan Eid ) ही खास असते. इस्लामिक कॅलेंडर नुसार, रमजान हा पवित्र महिना आहे. या महिन्याची सांगता रमजान ईद साजरी करत केला जातो. या ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव एकमेकांची गळाभेट शुभेच्छा देतात. यंदा भारतामध्ये रमजान ईद 11 एप्रिल दिवशी आहे. ईद ही चंद्र दर्शनावर अवलंबून असते. इस्लामिक कॅलेंडर नुसार 10 व्या शव्वाल महिन्याचा पहिला चंद्र दिसला की ईद साजरी केली जाते. मग या रमजान ईदच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना देऊन या सणाचा देखील गोडवा वाढवण्यासाठी WhatsApp, Instagram, Facebook, Twitter वर शुभेच्छापत्रं, ग्रिटिंग्स, Wishes, Messages, Quotes, HD Images शेअर करत या ईदचा आनंद द्विगुणित करू शकाल.
ईद च्या दिवशी मशिदींमध्ये विशेष नमाज अदा केली जाते. घरात गोडा-धोडाचे देखील जेवण बनवले जाते. 'ईद मुबारक' म्हणत गळाभेट घेतली जाते. रमजान ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधव अल्लाह चे आभार व्यक्त करतात. घरात लहान मुलांना 'ईदी' च्या स्वरूपात भेटवस्तू किंवा पैसे दिले जातात. Eid Mubarak 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून Eid-ul-Fitr च्या शुभेच्छा .
रमजान ईदच्या शुभेच्छा
![](https://cmsmarathi.letsly.in/wp-content/uploads/2024/04/5-Eid-Msg.jpg)
![](https://cmsmarathi.letsly.in/wp-content/uploads/2024/04/4-Eid-Msg.jpg)
![](https://cmsmarathi.letsly.in/wp-content/uploads/2024/04/3-Eid-Msg.jpg)
![](https://cmsmarathi.letsly.in/wp-content/uploads/2024/04/2-Eid-Msg.jpg)
![](https://cmsmarathi.letsly.in/wp-content/uploads/2024/04/1-Eid-Msg.jpg)
ईद-उल-फित्र हा बंधुभाव जपण्याचा, सलोख्याचा सण आहे. त्यामुळे विविधतेत एकता जपणार्या भारत देशामध्येही ईदचा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. मुस्लिम धार्मिक मान्यतांनुसार मोहम्मद पैगंबर यांनी इ.स 624 मध्ये बद्रच्या युद्धात विजयाच्या आनंदात ईद-उल-फित्र साजरी करणाऱ्या लोकांची तोंडे गोड केली होती, म्हणून मुस्लिम समाजातील लोक एकमेकांना गोड शेवया बनवून हा दिवस आनंदात साजरा करतात.