
रमजान (Ramadan) महिन्याचा शेवट हा रमजान ईद साजरी करून केला जातो. जगभरातील मुस्लिम बांधवांसाठी रमजानचा दिवस हा खास असतो. या दिवशी एकमेकांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा देण्याची पद्धत आहे. महिनाभर रोजा हा विशिष्ट पद्धतीचा उपवास ठेवून प्रार्थना केल्यानंतर ईदच्या दिवशी विविध खाद्यपदार्थांवर ताव मारला जातो. यंदा शनिवार 22 एप्रिल दिवशी रमजान ईद साजरी केली जाणार आहे. दरम्यान ईद ही चंद्र दर्शनावर अवलंबून असते. इस्लामिक कॅलेंडर नुसार 10 व्या शव्वाल महिन्याचा पहिला चंद्र दिसला की ईद साजरी केली जाते.
ईदच्या निमित्ताने लहान मुलांना घरातील ज्येष्ठांकडून 'ईदी' देण्याची रीत आहे. तसेच या सणाला गोड पदार्थांची रेलचेल असते. ईद-उल-फित्र हा बंधुभाव जपण्याचा, सलोख्याचा सण आहे, या दिवशी मुस्लिम समाजाचे लोक मशिदीमध्ये नमाज अदा करतात आणि एकमेकांना मिठी मारतात सोबत ईद मुबारक म्हणतात. अल्लाहचे आभार मानण्याचा हा दिवस आहे. Ramzan Eid 2023 Latest Mehndi Design: रमजान ईदच्या निमित्ताने मेहंदी लावून तुमच्या हाताचे सौंदर्य वाढवा, या ट्रेंडी मेहंदी डिझाइन्स मधून घ्या आइडिया (Watch Video) .
रमजान ईदच्या शुभेच्छा

धर्म, जात यापेक्षाही मोठी
असते शक्ती माणुसकीची…
एकमेकांची गळाभेट घेऊन
शुभेच्छा देऊयात रमजान ईदची

बंधुत्वाचा संदेश देऊया,
विश्वबंधुत्व वाढीस लावूया,
रमजान ईद च्या दिवशी हीच धरुनी मनी इच्छा
सर्व मुस्लिम बांधवास रमजान ईद च्या शुभेच्छा

रमजान ईद मुबारक

सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा

ईद घेऊन येई आनंद
जोडू मनामनांचे बंध
सणाचा हा दिवस खास
ईद मुबारक तुम्हा सर्वांस
रमजान ईद मुबारक!
मुस्लिम धार्मिक मान्यतांनुसार मोहम्मद पैगंबर यांनी इ.स 624 मध्ये बद्रच्या युद्धात विजयाच्या आनंदात ईद-उल-फित्र साजरी करणाऱ्या लोकांची तोंडे गोड केली होती, म्हणून मुस्लिम समाजातील लोक एकमेकांना गोड शेवया बनवून हा दिवस आनंदात साजरा करतात.
उर्वरित भारताच्या तुलनेत केवळ केरळ राज्यामध्ये एक दिवस आधी ईद साजरी केली जाते. केरळ मधील मुस्लिम बांधव पारंपारिक इस्लामिक कॅलेंडरचं पालन करतात त्यामुळे त्यांची ईद सौदी अरेबिया सोबत साजरी केली जाते. भारतात अन्य ठिकाणी मात्र ईद सौदीतील सेलिब्रेशन नंतर साजरी होते.