Ramzan Mubarak 2020 Wishes & Greetings: रमजान उल करीम उत्सवाला लवकरच होणार सुरुवात; WhatsApp Status, HD Images आणि Stickers च्या माध्यमातून सर्वांना द्या या खास शुभेच्छा

रमजान उल करीम म्हणून ओळखल्या जाणार्‍या पवित्र रमजान महिन्याला येत्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. सौदी अरेबिया मध्ये 23 किंवा 24 एप्रिलला रोजे किंवा उपवासाला सुरुवात होणार आहे. भारतात ग्रीजियन कॅलेंडरनुसार रमजानची पहिली तारीख 24 किंवा 25 एप्रिल दर्शवत आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मानला जाणारा रमजानच्या उपवासाला लवकरच सरुवात होणार आहे. शुल्क प्रतिपदेच्या चंद्रदर्शनाने रोजे सुरु होतात आणि शव्वाल या दहाव्या महिन्यातील चंद्रदर्शनाने ते पूर्ण होतात. चंद्रदर्शन झाले की त्याच्या दुसऱ्या दिवशी 'ईद-उल्-फित्र' म्हणजेच 'रमजान ईद' साजरी केली जाते. फित्र हा शब्द दानाचे महत्त्व सूचित करतो. त्यामुळे ईद निमित्त धान्य, वस्त्र यांचे दान केले जाते. या दिवशी सर्व मुसलमान बांधव नवीन पोशाख परिधान करुन एकत्र जमतात. या भेटीच्या ठिकाणाला 'ईदगाह' असे म्हणतात. एकत्र नमाज पडून मग गळाभेट घेत एकमेकांना 'ईद मुबारक' अशा शुभेच्छा देतात

रमजान महिन्यात दिवसा व रात्री मिळून नऊ वेळा नमाज अदा केले जातात. इस्लाममध्ये रमजान महिन्यात खोटे बोलणे, वाईट कृत्य करणे, भांडण, गुन्हा अशा गोष्टींपासून दूर राहण्याची सूचना दिली आहे. संयम, त्याग, शांती, सहिष्णुता, चांगुलपणा, प्रामाणिकपणा माणसांच्या ठायी रुजविणारा महिना म्हणून याकडे पहिले गेले आहे. या पवित्र सणाच्या सुरुवतीला आपल्या मित्रमैत्रीणींना, नातेवाईकांना आणि आपल्या खास व्यक्तीला ईद मुबारकच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून खास Whats App Stickers, Facebook Greetings,SMS, Wallpapers पाठवून या सणाचा आनंद साजरा करा! हे देखील वाचा- Ramadan 2020 Date in India: भारतामध्ये रमझान महिन्याला यंदा सुरूवात कधी होणार?

रमजान ईदच्या शुभेच्छा- 

रमजान ईदच्या शुभेच्छा- 

रमजान ईदच्या शुभेच्छा- 

रमजान ईदच्या शुभेच्छा- 

रमजान ईदच्या शुभेच्छा- 

रमजान ईद हा सण मुस्लीम समुदाय मोठ्या उत्साहाने साजरा करतात.मात्र,

Shree Swami Samarth Punyatithi स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करणारे मराठी HD Images - Watch Video 

यावर्षी कोरोना विषाणूमुळे ही पहिलीच रमजान ईद असेल की, या दिवसात सर्व मशिदी बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.