पितृपक्ष (Photo Credit: wikimedia commons)

गणपती विसर्जन (Ganpati Visarjan) झालं की पौर्णिमेनंतर (Full Moon Night) लगेच पितृपक्षाला सुरुवात होते. हिंदू (Hindu) संस्कृतीत पितृ पक्षाचे विशेष महत्व आहे. या पंधरवाड्यात पूर्वज यमलोकातून आपल्या प्रियजनांना भेटायला पृथ्वीवर येतात अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या यमलोकी गेलेल्या आपल्या आदरजनांसाठी पितृपक्षा दरम्यान श्राध्द (Shraddha), पिंडदान केल्या जाते. या पंधरावाड्या दरम्यान आपण आपल्या पुर्वजांसाठी, त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पुजा केल्यास ते आपल्याला आशिर्वाद देतात आणि घरात सुखशांती लाभते. तसेच पुढील पिढीला पुर्वजांचा आशिर्वाद मिळतो अशी समज आहे. तरी पितृपक्षात केल्या जाणाऱ्या श्राध्द विधीपूर्वक तसेच पिंडदान करण्याचे काही विशेष महत्व हिंदू (Hindu) धर्मात सांगितल्या गेले आहेत.

 

यावर्षी पितृपक्षाची 10 सप्टेंबर (September) ते 25 सप्टेंबर या दरम्यान असणार आहे. हा एकूण 15 दिवसांचा कालावधी असणार आहे. तरी या दरम्यान श्राध्द (Shraddha), पिंडदान (Pindaadan) केल्यास ते अधिक लाभदायक ठरत.  पितृपक्षात श्रद्धासाठी तयार करण्यात आलेल्या पाच विशेष प्रकारच्या जीवांना भोजन देण्याचा नियम आहे. यासाठी सर्व प्रथम ब्राह्मणांसाठी शिजवलेले अन्न पाच भागांमध्ये काढून सर्वांचे वेगवेगळे मंत्र जपत, प्रत्येक भागावर अखंड ठेवून पंचबली अर्पण केली जाते. (हे ही वाचा:- Ganesh Visarjan 2022: गिरगाव चौपाटी वरही लालबागच्या राजाच्या विसर्जनाला भाविकांचा जनसागर; पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनाला आज मार्गस्थ)

 

पितृपक्षात (Pitrupakshat) श्राध्द केल्यास दरम्यान पिंडदानाची (Pindadan) विशेष विधी आहे. कुटुंबातील जेष्ठ व्यक्तीच्या हस्ते हे पिंडदान केल्या जाते. स्नान करुन, नवे वस्त्रसह हातात कुश गवताची अंगठी घालून ही पिंड दानाची पूजा करण्यात येते. दरम्यानच्या पुजेत मृत पुरवजाच्या फोटोची (Pooja) पुजा करावी तसेच पुजे दरम्यान मृत व्यक्तीच्या फोटोचे मुख दक्षिणेकडे (South) तर पुजा करणाऱ्याचे मुख उत्तरेकडे असावे. तसेच पुर्वजांना अर्पण करण्यात येणारे पिंड मध (Honey), तांदूळ (Rice), गहू (Wheat), बकरीचे दूध (Goat Milk), साखर (Sugar) आणि तूप यापासून बनवले जाते. या संपूर्ण पुजेनंतर अन्नदान केल्या जाते.