
पश्चिम बंगाल (West Bengal) राज्यामध्ये नवरात्री (Navratri 2023) म्हणजेच दुर्गोत्सव (Durga Puja) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. खास करुन या उत्सवात देवीची आरास आणि समोर उभारेले देखावे विशेष आकर्षण असतात. कोलकाता येथील 'पाथुरीघाट पंचेर पल्ली' (Pathurighata Pancher Pally) येथे या निमित्त उभारलेला देखावा विशेष लक्षवेधी आहे. येथे उभारलेला देखवा महिलांच्या मासीक पाळी (Ritumati Menstrual Hygiene) दरम्यान मानल्या जाणाऱ्या निषिद्ध प्रथा, परंपरांना विरोध करणारा आणि विज्ञानावर आधारीत माहिती देणारा प्रबोधानत्मक आहे. पाठिमागील अनेक दशकांपासून येथे दुर्गोत्सव साजरा केला जातो. यंदाचे येथील दुर्गापुजेचे हे 84 वे वर्ष आहे. पाथुरियाघाटा पंचर पल्ली सर्वजनीन दुर्गोत्सव समितीच्या कार्याध्यक्षा एलोरा साहा यांनी माहिती देताना सांगितले की, समाजामध्ये मासीक पाळी याबद्दल अनेक गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करण्यासाठीच आम्ही हा देखावा उभारला आहे.
नागरिकांच्या मनात मासीक पाळीबद्दल असलेले गैरसमज दूर व्हावेत यासाठी आम्ही मासिक पाळी स्वच्छता किंवा 'ऋतुमती' ही थीम निवडली आहे. ही संकल्पना लोकांपर्यंत अधिकाधिक पोहोचावी यासाठी आम्ही उत्सुक आहोत. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून आम्हाला त्यांच्या प्रतिक्रियाही जाणून घ्यायच्या आहेत, असे इलोरा साहा म्हणाल्या.

पुढे बोलतान त्यानी सांगितले मासिक पाळी ही एक सामान्य जैविक प्रक्रिया आहे, आणि तिला कोणत्याही प्रकारच्या पडद्याआड ठेवण्याची गरज नाही. हीच वेळ आहे की आपण निषिद्ध प्रथांना तोडण्याची आणि त्याची पहिली पायरी आहे अशा प्रथांवर सार्जनिक भाष्य करण्याची.

अधिक जोर देत इलोरा साहा म्हणाल्या, आपल्या समाजात, लोक मासिक पाळीला निषिद्ध मानतात. इतपर्यंत की, जर महिलेला मासिक पाळी आली असेल तर तिला स्वयंपाकघरात प्रवेश नाकारला जातो. तिला पतीसोबत बेडही शेअर करता येत नाही. त्यांना घराबाहेर पडण्यास परवानगी नसते. इतकेच नव्हे तर त्यांच्यासोबत अत्यंत क्रूर वर्तन केले जाते. या काळात घ्यावयाची काळजी याबद्दलही त्यांना पुरेशी माहिती दिली जात नाही. त्यामुळे स्वच्छता, विश्रांती याबाबत अनेक महिलांना सजगता नसते. त्यामुळे हीच वेळ आहे पुढे येण्याची. महिलांना याबाबत अधिक माहिती दिली पाहिजे. मुलींनाही त्याबद्दल सजग केले पाहिजे. लोकांनीसुद्धा ही इतर प्रणालींप्रमाणे एक साधी, सामान्य जैविक प्रक्रिया म्हणून घेतली पाहिजे. यात गौरव करण्यासारखे काहीही नाही, तसेच लपवण्यासारखे काहीही नाही. आपण या अंधश्रद्धेतून बाहेर पडायला हवे.

उल्लेखनीय म्हणजे हा देखावा उभारण्यासाठी साधारण 18 लाख रुपयांचा खर्च आल्याची माहिती सजावट प्रमुख मुख्य कलाकार मनश रॉय देतात. आमच्या देखावा पेंटिंग्ज, मॉडेल्स आणि ग्राफिक्स यांसारख्या इन्स्टॉलेशन आर्ट्सवर आधारित आहे. ज्यात मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेवर भर दिला जातो, असे ते म्हणाले.