Navratri 2021 Messages: नवरात्र आणि घटस्थापनेच्या मंगल प्रसंगी खास मराठी Greetings, Wallpapers, Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून द्या शुभेच्छा
Navratri 2021 Messages (File Image)

शारदीय नवरात्र (Navratri 2021) हे हिंदू धर्मियांचे एक प्रमुख पर्व आहे, ज्याचा अर्थ ‘नऊ रात्री' असा होतो. या नऊ रात्री आणि दहा दिवसांमध्ये शक्ती/देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. दहाव्या दिवशी दसरा साजरा होतो. वसंताची आणि शरद ऋतूची सुरुवात हा हवामान आणि सूर्याच्या परिणामांचा महत्त्वपूर्ण संगम मानला जातो, त्यामुळे हा काळ माँ दुर्गाच्या पूजेसाठी पवित्र मानला जातो. शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते.

नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. त्या दिवसापासून देव्हाऱ्यात अखंड नंदादीप तेवत असतो, देवीला दररोज पिवळ्या फुलांची माळ चढवली जाते,  देवीपुढे सप्तशतीचा पाठ करून शारदीय नवरात्री व्रत केले जाते. यंदा 7 ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. या मंगल प्रसंगी तुमचे आप्तेष्ठ, मित्रमंडळी यांना खास Messages, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs यांच्याद्वारे नवरात्र आणि घटस्थापनेच्या शुभेच्छा देऊ शकता.

नवरात्रीच्या मंगल पर्वावर माता देवी

तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर्य प्रदान करो,

तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो हीच प्रार्थना

नवरात्र आणि घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा!

Navratri 2021

अंबा, माया, दुर्गा, गौरी

आदिशक्ती तूच सरस्वती

सकल मंगल माझ्याच घटी

विश्वाची स्वामिनी जगतजननी

नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!

Navratri 2021
शरद ऋतूत रंगे उत्सव नवरात्रीचा

ओसंडून वाहू दे आपल्या आयुष्यात पूर,

 नाविन्य, आनंद आणि सुखाचा

शारदीय नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा!

Navratri 2021

नवी पहाट, नवी आशा

तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा नवी दिशा

नवे स्वप्न, नवीन आकांक्षा

नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा!

Navratri 2021

देवी लक्ष्मीची कायम साथ राहो

देवी सरस्वतीचा डोकी हात राहो

श्री गणेशांचा घरात निवास राहो

आणि आई दुर्गेचा नेहमी आशीर्वाद राहो

नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा!

Navratri 2021

दरम्यान, नवरात्रीचे पहिले तीन दिवस देवी दुर्गाच्या पूजेला समर्पित आहेत. ही पूजा देवीची उर्जा आणि शक्तीसाठी केली जाते. नवरात्रीचा चौथा, पाचवा आणि सहावा दिवस लक्ष्मीच्या पूजेला समर्पित आहे, जी समृद्धी आणि शांतीची देवता आहे. सातव्या दिवशी कला आणि ज्ञानाची देवी सरस्वतीची पूजा केली जाते. आठव्या दिवशी देवीचा सन्मान आणि निरोपार्थ 'यज्ञ' केला जातो. नववा दिवस म्हणजे नवरात्रीचा शेवटचा दिवस. याला महानवमी असेही म्हणतात. या दिवशी कन्यापूजन केले जाते. (हेही वाचा: Tuljapur Navratri Utsav 2021: शारदीय नवरात्रीसाठी तुळजा भवानी मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी नियमावली जाहीर)

त्यानंतर आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी साजरी होते. चामुंडा देवीने महिषासुराशी युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध केला अशी कथा आहे. हा दिवस नवरात्रीच्या समाप्तीचा दिवस मानला जातो.