Gangasagar Mela 2023: नागा साधू (Naga Sadhu) म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ती अंगाला भरपूर भस्म, राख फासलेली जटाधारी आणि वस्त्रांचा (बहुतेक वेळा) त्याग केलेली व्यक्तीरेखा. जिच्या भालप्रदेशावर चंदनाचा मोठा टिळा आणि हातात चिलीम आणि त्रिशूळ आढळते. नागा साधू (Naga Sadhu Photos) म्हणजे ना काल घडल्याचा विचार.. ना वर्तमानाची काळजी अथवा भविष्याची चिंता. असे हे नागा साधून सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. याच नागा साधूंचे फोटो आज आम्ही इथे देत आहोत. कदाचित जे आपण प्रथमच पाहात असाल.
पश्चिम बंगाल राज्यातील गंगासागर येथे हजारो नागा साधू आणि भक्तांनी हजेरी लावली आहे. गंगासागर मेळा हा कुंभनंतरचा सर्वात मोठा मेळा म्हणून प्रसिद्ध आहे. या मेळ्यात विविध धार्मिक विचारांचे लोक उपस्थिती लावतात. गंगासागर मेळ्यात स्नान करणे हा अनेक भाविक पर्वणीचा क्षण समजतात. त्यामुळे अशा ठिकाणी नेहमीच मोठी गर्दी पाहायला मिळते. (हेही वाचा, Kumbh 2019: यंदाच्या कुंभमेळ्यात Engineers ते Management Graduates तब्बल 10 हजार लोकांनी स्विकारली नागा साधूंची दीक्षा)
गंगासागर मेळ्याच्या पार्श्वभूमीवर वृत्तसंस्था एएनआयने काही नागा साधूंशी संवाद साधला. या वेळी, एका नागा साधूने सांगितले की, उद्या आपण गंगासागरला जाऊ आणि नदीत डुबकी मारू. मी 25 डिसेंबरपासून इथेच (गंगासागर) थांबलो आहे आणि स्नान करून उज्जैनला परत येईन,असे मध्य प्रदेशातील एका नागा साधूने शुक्रवारी ANI ला सांगितले. जम्मू येथील नागा साधू शिव कैलाश पुरी यांनी सांगितले की, मी येथे 10 वर्षांपासून येत आहे आणि उद्या गंगासागर येथे स्नान करण्यासाठी जाईन. सनातन धर्मा'मधील सर्व तीर्थक्षेत्रांपैकी सर्वात मोठे यात्रेकरुंचे ठिकाण म्हणून गंगासागर ओळखले जाते. त्याबद्दल युगानुयुगे बोलले जात आहे," असे 2003 पासून गंगासागरला भेट देणारे दुसरे नागा साधू म्हणाले. (हेही वाचा, Kumbh Mela 2019: नागा साधूंची कथा तुम्हाला माहिती आहे का? जाणुन घ्या येथे)
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि जम्मूमधून गंगासागर मेळ्यासाठी नागा साधू पश्चिम बंगालमध्ये जात आहेत. बाबुघाट हे तात्पुरते गाव आहे, जे दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील गंगासागर जत्रेला भेट देणाऱ्या भाविकांच्या मुक्कामासाठी अल्प कालावधीसाठी बनवले जाते.
गंगासागर मेळा, कुंभमेळ्यानंतरचा दुसरा सर्वात मोठा मेळा आहे. जो कोविड निर्बंधांमुळे दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर प्रथमच मुक्त वातावरणात पार पडतो आहे.
प्राप्त माहितीनुसार, गंगासागर मेळ्यात सुमारे 30 लाख यात्रेकरू येण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी सरकारने आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. मेळ्यातील कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आणि प्रत्यक्ष मेळ्याच्या ठिकाणी सुरक्षा राखण्यासाठी सुमारे 1100 सीसीटीव्ही कॅमेरे स्थापित केले गेले आहेत. असे असले तरी, सरकारने मेळ्यादरम्यान पाळल्या जाणार्या कोणत्याही मार्गदर्शक सूचना जारी केल्या नाहीत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी बोलताना मेळ्याच्या तयारीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की गंगासागर येथे तीन हेलिपॅडचे उद्घाटन करण्यात आले आहे. गंगासागरचा मार्ग अतिशय खडतर असल्याने मौरीग्राम पुलासाठी डिटेल रिपोर्ट प्रोजेक्ट (डीआरपी) तयार करण्यात येत आहे.
गंगासागरमध्ये 14 ते 15 जानेवारीला पवित्र डुबकी आयोजित करण्यात आली असल्याने मेळ्यात 8 ते 17 जानेवारी दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास ते 5 लाख रुपयांचा विमा प्रदान करतील, असेही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे.