Kumbh 2019: यंदाच्या कुंभमेळ्यात Engineers ते Management Graduates तब्बल 10 हजार लोकांनी स्विकारली नागा साधूंची दीक्षा
नागा साधू (फोटो सौजन्य-फेसबुक)

प्रयागराज येथे महाकुंभ 2019 या सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी सर्व नागा साधू (Naga Sadhu) कुंभमेळ्यात मोठ्या भक्तीसंख्येने सहभागी होतात.तर नागा साधूंना प्रथम स्नान करण्याची संधी दिली जाते. या साधूंमुळे कुंभमेळ्याचे आकर्षण द्विगुणीत होते.

तसेच नागा साधू यांचे आयुष्य हे साध्या साधुंपेक्षा खूप निराळे आणि खडतर असते. ही साधूमंडळी फक्त कुंभ मेळ्याच्याच वेळी भाविकांसमोर आलेले दिसून येतात. अशा स्थितीत कच्छ येथील 27 वर्षीय रजत कुमार राय (Rajat Kumar Rai) याने मरिन इंजिनिअर मध्ये डिप्लोमा केला आहे. मात्र समुद्राच्या सीमांवरील विशेष काम सोडून रजत राय ह्या तरुणाने नागा साधूची दीक्षा घेतली आहे. तर नाधा साधू बनण्यासाठी सनातन धर्मातील तपस्या अत्यंत कठीण असल्याचे मानले जाते.

रजत कुमार राय याच्यासह 29 वर्षीय शंभू गिरी (Shambhu Giri) या तरुणाने ही नागा साधू बनण्याचा मार्ग स्विकारला आहे. तर गिरी या तरुणाने युक्रेन येथून मॅनेजमेंट ग्रेज्युएशन केले आहे. त्याचसोबत बारावीला उज्जयेन मधून सर्वोत्तम गुण असलेल्या विद्यार्थ्यांधील एक आहे.

प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभ मेळ्याच्यावेळी या दोघांनी नागा साधू बनण्याची सामूहिक दीक्षा घेतली आहे. यासाठी दोघांनी त्यांचे केस आणि स्वत:चे पिंडदान केले आहे. तसेच रात्रभर चालणाऱ्या अग्निसमारोहात ही उपस्थिती लावली. त्यानंतर या दोघांना नागा साधू यांच्या आखाड्यात समावेश करण्यात आला आहे. (हेही वाचा-Kumbh Mela 2019: नागा साधूंची कथा तुम्हाला माहिती आहे का? जाणुन घ्या येथे )

या सर्वांनी सोमवारी (4 फेब्रुवारी) येणाऱ्या मौनी अमावस्यावेळी कुंभमध्ये शाही स्नान केले. तर मौनी अमावस्या ही कुंभ मेळ्यातील तारखेतील एक महत्वपूर्ण शुभ तिथी असल्याचे मानले जाते. रिपोर्टनुसार, यंदाच्या कुंभ मेळ्यातील अखिल भारतीय आखाडा परिषद, जे देशातील मुख्य मानले जाते त्यांनी कुंभच्या वेळी तब्बल 10,000 पेक्षा अधिक पुरुष आणि महिलांनी नागा साधू यांची दीक्षा घेतली आहे.

त्यामुळे नागा साधूंना त्यांच्या आयुष्यात खूप नियमांचे पालन करावे लागते. नागा साधू फक्त दिवसातून एकवेळ जेवण करु शकतात. त्याचप्रमाणे सात घरे फिरुन भिक्षा मागावी लागते. जर भिक्षा न मिळाल्यास त्यांना उपाशी राहावे लागते. फक्त जमिनीवर झोपून नागा साधूंना त्यांचे संपूर्ण आयुष्य पार पाडायचे असते.