Photo- X

Maha Kumbh 2025: प्रयागराजयेथील महाकुंभमेळ्यात लाखो भाविक संगमात स्नान करण्यासाठी दाखल होत आहेत. दरम्यान, उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांच्या पत्नी टीना अंबानी यांनीही महाकुंभात हजेरी लावत संगमात स्नान केले. अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांच्यासह इतरही अनेक नामवंत व्यक्ती या महाकुंभात सहभागी होत आहेत. पौष पौर्णिमेला १३ जानेवारीपासून सुरू झालेला महाकुंभ मेळ्यात अनेक भाविक येत आहेत. आतापर्यंत लाखो भाविकांचे स्वागत करण्यात आले आहे. पहिल्या १४ दिवसांत ११ कोटींहून अधिक लोकांनी संगमात स्नान केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत असून या महाकुंभात ४५ कोटींहून अधिक भाविक सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

अनिल अंबानी आणि टीना अंबानी महाकुंभमेळ्यात दाखल

कुंभमेळा १२ वर्षांतून एकदा भरतो.

महाकुंभमेळा दर १२ वर्षांतून एकदा भरतो आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. महाकुंभमेळा हा केवळ आध्यात्मिक दृष्टिकोनातूनमहत्त्वाचा नसून जगभरातील भाविकांना आकर्षित करणारा भारताच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे.

अंबानी दांपत्याने बिहारमधील महाबोधी मंदिरात दर्शन घेतले

अंबानी दाम्पत्याने नुकतीच बौद्धांचे प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या बिहारमधील महाबोधी मंदिराला ही भेट दिली. हे मंदिर बोधगया येथे असून येथेच भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती.