श्रावण (Shravan Maas) महिना आला म्हणजे सण समारंभांची रेलचेल असते. हिंदू धर्मीयांसाठी सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक महिना म्हणजे श्रावण महिना आहे. त्यामुळे श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी (Nag Panchami). श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. यंदा ही नागपंचमी 9 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये घराघरांमध्ये नागपंचमीच्या निमित्ताने नागदेवतेची पूजा करण्याची रीत आहे. सजीव रूपात नाग नसतील तर किमान धातू किंवा मातीच्या रूपात नाग पूजन करण्याची पद्धत आहे.
नागपंंचमीचं महत्त्व आणि पूजा कशी कराल?
नागपंचमी बद्दल हिंदू शस्त्रात आणि पुराणातही अनेक कथा आहेत. पण त्यापैकी एका कथेत भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून ते यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित वर आल्याचा दिवस श्रावण शुध्द पंचमी असल्याने नागपूजा प्रचारात आली. कृषीप्रधान भारत देशामध्ये नागपंचमीच्या दिवशी शेतीच्या कामाला सुट्टी देऊन हा सण साजरा करतो. शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही. घरातील गृहिणी देखील भाज्या चिरत नाही. तवा वापरत नाही. घरातच नागाची पूजा करून त्याला दूध लाह्यांचा प्रसाद दाखवला जातो. गव्हाची खीर, पुरणाची दिंड किंवा पातोळ्या करण्याची पद्धत आहे. Nag Panchmi 2024 Date: नागपंचमी कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व घ्या जाणून .
नागपंचमीला नागराज घरोघरी देवतेच्या रुपात विराजमान होतो. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची रीत आहे.नागाचे चित्र हळद किंवा रक्तचंदनाने साकारून त्याची प्रतिकात्मक पूजा करण्याची प्रथा आहे. तर काही ठिकाणी जिवंत सापाऐवजी मातीपासून बनवलेल्या नागाची प्रतिकृती पूजली जाते. महिला वर्गामध्ये नागपंचमीचं विशेष आकर्षण असते. या सणानिमित्त महिला, मुली हातावर मेहंदी काढतात. नागाच्या वारूळाची पूजा करून झिम्मा, फुगडी सारखे खेळ एकत्र येऊन खेळतात. नक्की वाचा: Nagchaturthi Upvas 2024: नाग पंचमी दिवशी महिलांनी भावासाठी उपवास का करावा?
महाराष्ट्रातील बत्तीसशिराळा या गावामध्ये नागपंचमीला प्रचंड मोठी जत्रा भरते. देशा-परदेशातील लोकांना या जत्रेचं मोठं आकर्षण आहे.
(टीप: सदर लेख हा केवळ माहिती देण्याच्या हेतूने लिहलेला आहे. लेटेस्टली मराठी कोणत्याही धार्मिक, अंधश्रद्धांना चालना देणार्या गोष्टींचा पुरस्कार करत नाही.)