Marathi Patrakar Din 2024 Wishes: बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त Greetings, Messages, Quotes, HD Images शेअर करा द्या मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा
Marathi Patrakar Din 2024 Wishes

Marathi Patrakar Din 2024 Wishes: मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर (Balshastri Jambhekar) यांची आज जयंती. महाराष्ट्रामध्ये हा दिवस ‘मराठी पत्रकार दिन’ (Marathi Patrakar Din 2024) म्हणून साजरा केला जातो. मराठी पत्रकारितेने भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि सशक्त लोकशाहीच्या वाटचालीत आपला वेगळा मानदंड प्रस्थापित केला आहे. याची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 साली केली. समाज प्रबोधनासाठी त्यांनी मुंबई येथे 6 जानेवारी 1832 रोजी 'दर्पण' या नावाने पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. आता या पत्रकारिताविश्वाचे एका वटवृक्षात रुपांतर झाले आहे.

बाळशास्त्री जांभेकरांची नक्की जन्मतारिख उपलब्ध नाही. काही ठिकाणी ती 6 जानेवारी नमूद आहे, तर काही ठिकाणी 20 जानेवारी. मात्र त्यांचा जन्म 1812 साली कोकणातील वाघोटन घाटीच्या किनारी असलेल्या पोंभुर्ले या गावी झाला.

त्यांनी समाजजागृती, ज्ञानप्रसार व लोककल्याणासाठी 12 नोव्हेंबर 1831 रोजी दर्पण वर्तमानपत्राची घोषणा केली आणि 6 जानेवारी 1832 रोजी दर्पणचा पहिला अंक निघाला. दर्पण हे पश्चिम भारतातील पहिले इंग्रजी व मराठी वृत्तपत्र होते. सुरवातीस चार महिने पाक्षिक व नंतर ते साप्ताहिक झाले. याच दिवसाची आठवण म्हणून 6 जानेवारीला महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन साजरा होतो. (हेही वाचा: Rajmata Jijau Jayanti Date: राजमाता जिजाऊंची जयंती कधी असते?)

तर या दिवसाचे औचित्य साधत काही खास Messages, WhatsApp Status, Wishes, Quotes शेअर करून द्या मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा.

Marathi Patrakar Din 2024 Wishes
Marathi Patrakar Din 2024 Wishes
Marathi Patrakar Din 2024 Wishes
Marathi Patrakar Din 2024 Wishes
Marathi Patrakar Din 2024 Wishes
Marathi Patrakar Din 2024 Wishes
Marathi Patrakar Din 2024 Wishes
Marathi Patrakar Din 2024 Wishes

दरम्यान, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी समाजसुधारणा, शिक्षण आणि वृत्तपत्र प्रसार यासाठी केलेले कार्य हे अलौकिक आहे. समाज सुधारला तरच राजकीय स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त होईल असे त्यांचे मत होते. म्हणूनच त्यांनी वर्तमानपत्रासारख्या एका मोठ्या शक्तीचा उपयोग समाजात बदलासाठी केला. त्यांनी 'दर्पण'मध्ये एकही जाहिरात छापली नाही. जवळपास साडेआठ वर्षे 'दर्पण'चे अंक निघत राहिले. 26 जून 1840 रोजी याचा शेवटचा अंक निघाला.