Close
Search

Rajmata Jijau Jayanti Date: राजमाता जिजाऊंची जयंती कधी असते?

छत्रपती शिवाजी महाराजच नाही तर त्यांचे नातू छत्रपती संभाजी महारांजांचे संगोपन देखील जिजाऊंच्या संस्कारातच झाले.

सण आणि उत्सव टीम लेटेस्टथटिट्यूटचा कॅन्सरवर यशस्वी उपचाराचा दावा; अवघ्या 100 रुपयांत उपलब्ध होणार नवी गोळी, जाणून घ्या सविस्तर
Close
Search

Rajmata Jijau Jayanti Date: राजमाता जिजाऊंची जयंती कधी असते?

छत्रपती शिवाजी महाराजच नाही तर त्यांचे नातू छत्रपती संभाजी महारांजांचे संगोपन देखील जिजाऊंच्या संस्कारातच झाले.

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली|
Rajmata Jijau Jayanti Date: राजमाता जिजाऊंची जयंती कधी असते?
Rajmata Jijau Jayanti (File Image)

छत्रपती शिवाजी महाराज यांची आई राजमाता जिजाऊ (Rajmata Jijau) यांची तारखेनुसार जयंती 12 जानेवारी दिवशी साजरी केली जाते. यंदा जिजाऊंची 426 वी जयंती आहे. शिवबांच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा असणार्‍या राजमाता जिजाऊ साहेबांच्या जयंतीला (Rajmata Jijau Jayanti) देखील शिवभक्त मोठी गर्दी करतात. जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये बुलढाण्यातील सिंदखेडराजा गावामध्ये झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी दरवर्षी जिजाऊंप्रति आदर व्यक्त केला जातो. विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

परकीय आक्रमणांनी घेरलेल्या महाराष्ट्राला स्वराज्याची गरज होती. हेच हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना राजमाता जिजाऊंनी प्रेरणा दिली होती. शिवजन्मापूर्वी महाराष्ट्रामध्ये प्रजेचे अतोनात हाल सुरू होते. सततच्या आक्रमणांची झळ सामान्य प्रजेला बसत होती. शिवरायांच्या जन्मानंतर मात्र ही स्थिती बदलत गेली. प्रजेच्या हाल अपेष्टा दूर करण्याच्या दृष्टीने जिजाऊंनी शिवरायांवर संस्कार केले. त्यांना घडवलं.

लघुजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा बुलढाण्यात जन्म झाला. जिजाऊ दांडपट्टा आणि अश्वारोहण या युद्ध कलांमध्ये पारंगत होत्या. डिसेंबर 1605 मध्ये त्यांचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्यासोबत दौलताबाद इथे झाला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंनी शिवबांना जन्म दिला. जिजाऊंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली तर दोन मुले होती. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केले. जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज युद्ध कला शिकू लागले होते.

23 जानेवारी 1664 साली शहाजी राजे यांचे निधन झाले. मात्र पतीच्या पश्चातची त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. छत्रपती शिवाजी महाराजच नाही तर त्यांचे नातू छत्रपती संभाजी महारांजांचे संगोपन देखील जिजाऊंच्या संस्कारातच झाले.

जिजाऊ जन्मस्थळाची  आता दुरावस्था झाली आहे.  सध्याची त्याची स्थिती पाहून जिजाऊंचे वंशज आणि जिजाऊ भक्त आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी प्रशासन, सरकारने लक्ष न दिल्यास यंदा जिजाऊ जयंती पूर्वी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change