मकर ही एक रास असून सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती असे म्हटले जाते. तर मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti 2020) दिवशीच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांती म्हणतात. यादिवशी अनेकजण तीळ आणि गूळाची खास मिठाई करुन सर्वांना वाटली जाते. याशिवाय नवीन वर्षाला सुरुवात झाली की, अनेकांना पतंगीचे वेध लागलेले असते. दरम्यान, काही ठिकाणी काईट फेस्टिव्हल देखील भरतात. यामुळे अशाप्रकारच्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आणि आपल्या पतंगीचे आकर्षण वाढवण्यासाठी जाणून घ्या (Easy Ways to Make Kites or Patang at Home) घरगुती पतंग बनवण्याची सोपी पद्धत.
अवघ्या काही दिवसांवर आलेल्या संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पतंग आणि मांजा विक्रीची दुकाने सर्वत्र थाटली गेली असून, दिवसेंदिवस आकाशातही रंगीबेरंगी पतंगींची गर्दी वाढत आहे. या आनंदाच्या उत्सवात विघ्न येऊ नये, याकरिता महावितरणने सर्व संक्रांतप्रेमींना पतंग उडविताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. हे देखील वाचा- Makar Sankranti 2020 Special: मकर संक्रांती दिवशी पतंगबाजीचा खेळामध्ये बाजी मारायला मदत करतील या खास टीप्स (Watch Video)
घरगुती पतंग बनवण्याची सोपी पद्धत-
घरगुती पतंग बनवण्यासाठी प्लास्टिक पतंग पेपर, दोरा, 2 काड्या, कात्री, एक रिबीन तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे. पतंग बनवण्यासाठी तुम्हाला आवडेल त्या रंगाचा पेपर निवडू शकता. सुरुवातीला तुम्हाला पतंग तयार करण्यासाठी प्लास्टिक पेपरची चौकट तयार करावी लागेल. त्यानंतर एक काडी पतंगच्या मध्यमागी चिटकावी लागणार आहे. तर दुसरी काडी पहिल्या काडीच्या विरोद्ध लावावी लागेल. दोन्ही काड्या चिटकवून झाल्यानंतर पतंगीच्या खालच्या बाजूला रिबीन चिटकवणे गरजेचे आहे. हवेत पंतग गेल्यानंतर समतोल बनवण्यासाठी रिबीन चिटकवने गरजेचे आहे.
युट्यूब व्हिडिओ-
मकर संक्रांत हा सण केवळ भारतातच साजरा होतो असे नाही तर आशिया खंडातील अनेक ठिकाणी तो साजरा केला जातो. नेपाळमध्ये याला माघी किंवा माघी संक्रात, थालंड मध्ये सोंग्क्रान, लाओस मध्ये पी मा लाओ आणि म्यानमार मध्ये थिंगयान असे म्हटले जाते. भारतात देखील याला लोहरी, मकर संक्रांती, पोंगल इत्यादी नावे आहेत. या सणाला गुजरात आणि राजस्थान राज्यांमध्ये पतंगाचा सण म्हणून ओळखले जाते.