Lokamanya Tilak 163rd Birth Anniversary: इतिहासाच्या पाऊलखुणा नीट निरखून पाहिल्यास प्रत्येक घोषणा ही आपल्याबरोबर नवा इतिहास घेऊन येते. उदाहरणच द्यायचं झालं तर, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या `मेरी झाँसी नहीं दूँगी' नंतर 1857चे पहिले भारतीय स्वातंत्र्य संग्राम पेटले होते. महात्मा गांधींनी दिलेल्या `चले जाव' या घोषणांमुळे देशभर ब्रिटिशविरुद्ध लढाई सुरू झाली. त्याचप्रमाणे स्वराज्याचे प्रणेते म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Bal Gangadhar Tilak ) यांनी दिलेल्या अनेक घोषणांना भारतीय स्वातंत्र्य लढ्यात असेच महत्वाचे स्थान आहे . टिळकांनी अहमदनगरमध्ये भर पावसात एका सभेत उच्चारलेल्या ."स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" या वाक्याने देशवासीयांच्या मनात स्वातंत्र्याचा अंगार फुलला. आणि पुढे सलग 31 वर्षे तो तसाच पेटत राहिला भारतीयांना देशप्रेम व स्वातंत्र्याची गरज याची जाणीव करून देणाऱ्या या टिळकांची आज 163 वी जयंती आहे,
लहानपणापासून हे औचित्य साधून शाळा, कार्यक्रमात अनेकांनी भाषणे दिली असतील याच भाषणांच्या आठवणींचे आणि त्यातून टिळकांच्या स्मृतीचे स्मरण करत जाणून घेऊयात टिळकांविषयीच्या या या 10 खास गोष्टी
मूळ नाव आणि कौटुंबिक इतिहास
केशव गंगाधर टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी मधील चिखली या गावी एका चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण घरात झाला होता.त्यांचे मूळ नाव जरी केशव असले तरी त्यांना प्रेमाने सर्वजण बाळ अशीच हाक मारत, पुढे ते नावाने प्रचलित झाले.टिळकांचे डील गंगाधर रामचंद्र टिळक आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. त्यांचे वडील हे तद्कालीन प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. टिळक शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर काहीच दिवसात त्यांचं आईचे तर वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी वडिलांचे निधन झाले. त्यानंतर काका गोविंदराव पंत यांनी टिळकणाचा सांभाळ केला स्वतः अशिक्षित असूनही गोविंद्रावणी नेहमीच टिळकांना प्रोत्साहन दिले, मृत्युपूर्वी गंगाधरपंतानी त्यांचा विवाह दहा वर्षाच्या तापीबाई बरोबर लावून दिला.
शैक्षणिक पदव्या
टिळक हे नेहमीच अभ्यासक, व तल्लख बुद्द्धीचे नेते हणून ओळखले जातात, लहानपणापासूनच त्यांचा पुराण व ग्रंथांचा तगडा अभ्यास होता. तसेच शिक्षणातही त्यांची गती अव्वल होती. यानुसार शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर 1877 मध्ये त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेज मधून गणित विषयात पदवी प्राप्त केली व त्यापाठोपाठ लगेचच 1879 मध्ये त्यांनी एलएलबी सुद्धा केली.
डेक्कन एज्युकेशन संस्थेची स्थापना
समाजप्रयवर्तनासाठी शिक्षण हाच मार्ग आहे असे ठाम मत असणाऱ्या टिळकांनी आपले मित्र गोपाळ गणेश आगरकर यांच्यासोबत मिळून 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.यामधून तरुणांना देशप्रेमाचे धडे दिले जाऊ लागले. या पाठोपाठ 1885 मध्ये त्यांनी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना करून तिथून त्यांनी गणित शिकवण्यास सुरुवात केली. कालांतराने 1890 मध्ये टिळक डेक्कन एज्युकेशन सोसायटीतून विभक्त झाले.
Lokmanya Tilak Jayanti 2019: जीवनाला योग्य दिशा दाखवणारे लोकमान्य टिळक यांचे अनमोल विचार
टिळक आणि काँग्रेस
टिळक हे सुरवातीपासूनच जहालमतवादी असल्याने त्यांनी 1890 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश घेताच पक्षाच्या मवाळ विचारसरणीला विरोध केला. काँग्रेस पक्षातील . लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांची राजकीय मते एकमेकांशी जुळणारी होती. यामुळे या त्रिकुटाला लाल-बाल-पाल असे नामकरण मिळाले, आणि पुढे हे त्रिकुट देशाच्या राजकारणात बरेच गाजले.
भारतीय असंतोषाचे जनक
ब्रिटीश लेखक सर व्हॅलेंटाईन चिरो यांनी टिळकांना फादर ऑफ इंडियन अनरेस्ट म्हणजेच भारतीय असंतोषाचे जनक असे म्हंटले होते. टिळकांच्या जहालमतामुळे अशी प्रतिमा तयार झाली होती असे म्हण्टले जाते.
राजद्रोहाचा खटला आणि तुरुंगवास
ब्रिटिश सरकारच्या जुलमी कायद्यामुळे आणि स्वतःच्या जहाल मतामुळे टिळकांना आपल्या हयातीत अनेकदा तुरुंगवास पत्करावा लागला. केसरी या वृत्तपत्रातून त्यांनी देशद्रोहाल प्रोत्साहन दिल्याचा आरोप लगावत ब्रिटिशांनी 1897 मध्ये त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. यासाठी त्यांना १८ महिने कारावास भोगावा लागला.यानंतर प्रफुल्ल चकी आणि खुदिराम बोस यांना पाठिंबा देणारे लेख लिहिण्यासाठी 1908 ते 1914 या सहा वर्षांसाठी त्यांना मंडालेच्या तुरुंगात धाडण्यात आले होते. या दोघांनी मुझ्झफरपूर मध्ये बंगालच्या मॅजिस्ट्रेट डोगयुल्स किंग्सफॉरवर बॉम्बहल्ला केला होता.
बंगालच्या फाळणी विरुद्धचा लढा
19 जुलै 1905 रोजी भारताने तत्कालीन वाइसराय लॉर्ड कर्झन द्वारा केली गेली होती. देशात फूट पडण्याच्या या कृत्याविरुद्ध बंगाल प्रांतात वंग भंग आंदोलन सुरू झाले.या घटनेच्या विरोधात लोकमान्य टिळक, बिपीनचंद्र पाल, व लाला लजपतराय यांनी रान उठविले होते. याच पार्श्वभुमीवर आनंद मोहन बोस यांच्या अध्यक्षतेखाली टिळकांनी स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चतु:सूत्रीची घोषणा केली.
केसरी व मराठा ची सुरुवात
टिळकांनी आगरकर, चिपळूणकर आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने इ.स. 1881 साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी हे मराठीतून प्रसिद्ध होत होते तर मराठा हे इंग्रजीमधून. 1882 च्या अखेरीस केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले. यापुढी चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी केसरीमधून 513 अग्रलेख लिहिले.टिळकांचे अग्रलेख हे खऱ्या अर्थाने केसरीचा बाणा म्हणून ओळखले जात होते. ' सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ', ' उजाडले पण सूर्य कुठे आहे ,' ' टिळक सुटले पुढे काय ',हे त्याचेच काही खास नमुने आहेत.
गणेशोत्सव व शिव जयंती
हिंदूंना एकत्र आणण्यासाठी 1894 मध्ये टिळकांनी घरगुती स्तरावरील गणेशोत्सवाला सार्वजनिक बनवण्याचे आवाहन केले, त्यानुसार सर्वत्र गणेशटोसॅव्ही साजरा होऊ लागला तसेच शिवाजी महाराजांच्या स्वरूपात लोकांना एक आदर्श मिळावा या हेतूने त्यांनी शिवजयंतीची सुद्धा सुरुवात केली.
टिळक युगाचा अंत
1 ऑगस्ट 1920 रोजी प्लेगच्या आजाराने टिळकांचे देहावसान झाले.
टिळकांनी भारतीय जनतेला एकत्र आणलं, आपल्या प्रखर विचारांनी नेहमीच सर्वांसमोर आदर्श घालून दिला, त्यामुळेच भारताच्या इतिहासात टिळक हे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे.