Lokmanya Tilak 100th Death Anniversary 2020: 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच' अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळकांची आज 100 वी पुण्यतिथी! शब्दात सांगता न येणारे असे आभाळाएवढे समाजकार्य. देशसेवेचे व्रत हा एकच ध्यास लागलेल्या महान पुरुषांची आजची 100 वी पुण्यतिथी. कोकणात रत्नागिरीच्या चिखली गावामध्ये जन्मलेल्या लोकमान्य टिळकांनी अनेकदा आपल्या भाषणातून, लेखणीमधून तर प्रसंगी आंदोलनामधून ब्रिटीश सरकार विरूद्ध आपल्या आपल्या भावना व्यक्त केल्या. प्राणांची आहुती देऊन भारत देशाला ब्रिटीशांच्या जाचातून भारताची मुक्तता केली.
बाळ गंगाधर टिळक यांना 'लोकमान्य' या उपाधीने देखील ओळखले जाते. त्याचसोबत टिळक यांना असंतोषाचे जनक म्हणून ही संबोधले जाते.टिळक हे जहालमतवादी असल्याने स्वातंत्रलढ्यावेळी ब्रिटिश सत्तेला पराभूत करण्यासाठीच्या लढ्यात त्यांनी जहाल आणि मवाळ असे दो गट पाडले होते. लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांची राजकीय मते एकमेकांना जुळणारी असल्याने या त्रिकुटाला लाल-बाल-पाल असे म्हटले जायचे. संस्कृत, गणित, खगोलशास्त्र यांचेदेखील ते अभ्यासक होते आणि त्यांनी गीतारहस्य सुद्धा लिहिले आहे.(लोकमान्य टिळक यांचे विचार प्रेरणादायी विचार)
लोकमान्य टिळकांच्या पत्रकारितेचा प्रवासाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी आगरकर, चिपळूणकर आणि इतर सहकार्यांच्या मदतीने 1881 साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी हे मराठीतून प्रसिद्ध होत होते तर मराठा हे इंग्रजीमधून. अलिप्त भारतीय समाजाला भोवताली घडणार्या घटनांचा निरपेक्ष अहवाल देणे हा केसरीचा मुख्य उद्देश होता. केसरीमधून त्या काळातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य तसेच समकालीन मराठी साहित्याची परीक्षणे प्रकाशित होत असत. तर मराठा वृत्तपत्र हे मुख्यत: शिक्षित भारतीय समाजासाठी होते. त्यामध्ये देश-विदेशातील घटना व त्यांवरील भाष्य छापून येत असे. दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयांमध्ये खूप लवकर लोकप्रिय झाली.(लोकमान्य टिळक यांचा फोटो वापरुन गोपाळ कृष्ण गोखले यांना श्रद्धांजली; उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्याकडून 'ध' चा 'मा')
पुण्यातील प्लेगच्या आजारामध्ये लोकमान्य टिळक यांचे 1 ऑगस्ट 1920 दिवशी निधन झाले. टिळकांनी भारतीय जनतेला एकत्र आणलं, आपल्या प्रखर विचारांनी नेहमीच सर्वांसमोर आदर्श घालून दिला, त्यामुळेच भारताच्या इतिहासात टिळक हे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे.