बाळ गंगाधर टिळक (Bal Gangadhar Tilak) हे महाराष्ट्रातील युगपुरूषांपैकी एक नाव. स्वातंत्र्यसेनानी, उत्तम वक्ते, पत्रकार, तत्त्वज्ञ बाळ गंगाधर टिळकांचा जन्म कोकणातील रत्नागिरी मधील चिखली गावामधला. 23 जुलै 1856 साली त्यांचा एका सामान्य कुटुंबात जन्म झाला. आज लोकमान्य टिळकांची 164 वी जयंती आहे. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' असं ठणकावून सांगणार्या लोकमान्य टिळकांच्या बहूआयामी व्यक्तिमत्त्वाची आपल्या पुढच्या पिढीला देखील ओळख व्हावी यासाठी आता अनेक माध्यमं उपलब्ध आहेत. मात्र त्यांचे विचार आजच्या टिळक जयंतीच्या निमित्ताने सोशल मीडीयामध्ये व्हॉट्सअॅप (WhatsApp), फेसबूकच्या मेसेंजर (Facebook), स्टेटसच्या माध्यमातून शेअर करून देखील यंदा त्यांची जयंती साजरी होऊ शकते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये जहालवादी विचारसरणीचे लोकमान्य टिळक जाणून त्यांच्या विचारांमधून कसे होते. Lokmanya Tilak Jayanti लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त जाणून घ्या या 10 खास गोष्टी.
लोकमान्य टिळक यांचे विचार
महाराष्ट्रामध्ये सणांच्या माध्यमातून समाजात प्रबोधन करण्याची संकल्पना ही मूळची लोकमान्य टिळक यांची. त्यांनीच सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवाजी महाराज जयंती यांना सणाच्या स्वरूपात साजरी करण्याची प्रथा सुरू केली. त्यामध्ये मिरवणूका हा मोठा भाग होता. सोबतच केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्र त्यांनी सुरू केली. त्यामधून लोकांमध्ये प्रबोधन करण्याचे मोठे काम टिळकांनी केले आहे.