International Women's Day 2022 Date and Theme: यंदा 'या' खास थीम वर साजरा होणार 8 मार्च दिवशी जागतिक महिला दिन!
International Women's Day (Photo Credits-File Image)

आंतरराष्ट्रीय महिला दिवस (International Women's Day) दरवर्षी 8 मार्च दिवशी साजरा केला जातो. महिलांच्या सन्मानार्थ या दिवशी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षी महिला दिन एका खास थीम वर साजरा केला जाणार आहे. "Gender equality today for a sustainable tomorrow" ही यंदाची महिला दिनाची थीम आहे. अर्थात समाजात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून चालणारी स्त्री अजूनही समाजात काही ठिकाणी केवळ लिंग भेद करून समानसंधीपासून दूर ठेवली जाते. त्यामुळे Break The Bias म्हणत हाच लिंगभेद मोडण्यासाठी यंदा महिला दिन साजरा केला जाणार आहे. हे देखील नक्की वाचा: जागतिक महिला दिन सेलिब्रेशन मध्ये 'जांभाळ्या' रंगाचं महत्त्व काय?

महिला दिन साजरं करण्याचं महत्त्व

1909 मध्ये पहिल्यांदा 'जागतिक महिला दिन' साजरा करण्यात आला होता. नंतर 1975 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने एका थीमसह महिला दिन साजरा करण्याची प्रथा सुरु केली. तेव्हापासून या सेलिब्रेशनका अधिकृत मान्यता मिळाली. महिला दिनाची पहिली थीम 'सेलिब्रेटींग द पास्ट, प्लॅनिंग फॉर द फ्युचर.' अशी होती.

1908 मध्ये 15 हजार महिलांनी न्युयॉर्क शहरात मतदानाच्या अधिकारासाठी, कामाचे तास कमी करण्यासाठी आणि चांगल्या रोजगारासाठी मोर्चा काढला होता. त्यानंतर अमेरिकेच्या समाजवादी पार्टीने केलेल्या घोषणेनुसार, 1909 मध्ये युनाईटेड स्टेट्स मध्ये पहिला राष्ट्रीय महिला दिवस 28 फेब्रुवारीला साजरा करण्यात आला होता.

1917 साली रशियन महिलांनी केलेल्या निषेधानंतर त्यांना मताधिकार देण्यात आला. फेब्रुवारी 1918 साली युके मध्ये 30 महिलांना ज्यांच्याकडे स्वत:च्या मालकीची संपत्ती होती त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला. इतिहासात 1975 हे साल 'रेड लेटर ईअर' (Red Letter Year) म्हणून पाहिले जाते. कारण याच वर्षी युनाईटेड नेशनने 'जागतिक महिला दिना'ला अधिकृत मान्यता दिली. त्यानंतर 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा होऊ लागला.