International Women's Day 2019: 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन (Women's Day) म्हणून साजरा केला जातो. जागतिक स्तरावर महिला या दिवशी एकत्र येतात. विविध स्वरूपात या दिवशी महिला दिनाचं सेलिब्रेशन असतं. पण महिला दिन आणि 'जांभळा' (Purple) रंग या कनेक्शन थोडं खास आहे. जागतिक महिला दिनाच्या सेलिब्रेशनचा अधिकृत रंग जांभळा असतो. पण केवळ फॅशन म्हणून नव्हे तर जांभळा रंग आणि महिला दिन यांचं एक खास महत्त्व देखील आहे. मग यंदाचा वूमन्स डे थोडा खास बनवणार असाल तर जांभळ्या रंगाचे कपडे घालून हा दिवस थोडा खास करण्यामागील एक कारणदेखील नक्की जाणून घ्या. International Women's Day 2019: 8 मार्चला का साजरा केला जातो जागतिक महिला दिन? कशी झाली सुरुवात?
जागतिक महिला दिनी जांभळा रंग का घातला जातो?
महिला दिनी जांभळा रंगाचं महत्त्व केवळ तो एक सुंदर रंग आहे म्हणून नव्हे तर त्यासोबत इतिहास देखील आहे. लिंग समानता म्हणजेच Gender Equality चं प्रतिक म्हणून या रंगाकडे पाहिलं जातं. इंटरनॅशनल वूमन्स डे च्या अधिकृत वेबसाईटच्या माहितीनुसार, जांभळा, हिरवा आणि पांढरा हे रंग स्त्रियांची समाजातील समानतेचे प्रतीक आहेत. हे रंग न्याय आणि प्रतिष्ठा यांचं प्रतिक आहेत. हिरवा रंग 'आशा'देतो, पांढरा रंग 'पावित्र्य' जपतो तर 'जांभळा' रंग 'स्त्रियांनी मिळवलेलं यश' किंवा आगामी काळात त्या ज्या यशाला गवसणी घालू इच्छित आहेत त्यांचं प्रतिक आहे. International Women's Day 2019: भारतीय महिलांना आहेत हे '8' खास अधिकार!
जांभळा रंग हा 'महिला मुक्तता आंदोलन' (Women’s Liberation movement) याचं देखील प्रतिक आहे. स्त्रियांनी इतिहासात दिलेल्या त्यांच्या अधिकार आणि हक्काच्या लढ्यांमध्ये हाच जांभळा रंग प्रतिकात्मकतेने वापरण्यात आला होता. मग यंदा देखील 'Think Equal, Build Smart, Innovate for Change या थीमवर आधारित महिला दिनाचं सेलिब्रेशन करताना जांभळा रंग वापरायला विसरू नका.