11 डिसेंबर रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय पर्वत दिन (International Mountain Day) म्हणून साजरा केला जातो. तसेच आपल्या देशाची भौगोलिक रचना बघता भारतात हिमालय, सह्याद्री, सातपुडा, अरावली अशा अनेक जुन्या तसेच नवीज पर्वत रांगा आहेत. तसेच पर्वतारोहण करणाऱ्या लोकांचा एक मोठा वर्ग आपल्या देशात पाहायला मिळतो. त्यामुळेच आजचा या अंतरराष्ट्रीय पर्वत दिनाचं भारतीय नागरिकांमध्ये विशेष महत्त्व आहे.
अनेकदा आपण हे विसरतो की भारत हा भौगोलिक दृष्ट्या जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात भिन्न प्रदेश आहेत. तसेच जगातील सर्वात तरुण पर्वत रांग देखील भारतामध्येच आहे आणि ती म्हणजे हिमालय पर्वत रांग (Himalayas- The youngest mountain range) . तर आजच्या या खास दिवशी जाणून घेऊया जगातील या सर्वात तरुण पर्वत रांगेविषयी या काही खास गोष्टी.
हिमालय पर्वतरांगाची निर्मिती सुमारे 50 दशलक्ष वर्षांपूर्वी झाली असून ही जगातील सर्वात तरुण पर्वतरांग ठरली आहे. हिमालयाची उंची आजही दरवर्षी 20 मिलीमीटरने वाढत आहे. यामुळेच भूस्खलन आणि हादरे या भागात वारंवार होत असतात. हिमालय पर्वत रांगेत जगातील 9 सर्वोच्च शिखरे पाहायला मिळतात. एव्हरेस्ट (Mount Everest) हे सर्वोच्च शिखर देखील हिमालयीन पर्वत रांगेतच आहे.
माऊंट एव्हरेस्ट येथून उचलला तब्बल 3000 किलो कचऱ्याचा साठा
सर्वाधिक बर्फाचा घटक असणारं आर्टिक आणि अंटार्क्टिक नंतर हिमालय हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचं स्थान आहे. तसेच हिमालय पर्वतरांगांमध्ये 15000 हिमनद्या आहेत ज्या जवळपास 12000 घन किलोमीटर ताजे पाणी साठवतात.