Happy Navratri 2023 Wishes In Marathi: नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा देत सुरू करा देवीचा जागर
नवरात्री । File Images

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवाची (Navratri Utsav) सुरूवात होते. यंदा हा नवरात्र उत्सव 15 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. आदिशक्तीच्या पूजनाचे 9 दइवस हिंदू धर्मियांसाठी मंगलमय दिवस असतात. भारतामध्ये प्रांतानुसार नवरात्राची धूम देखील वेगळी असते. महाराष्ट्रात भाविक साडेतीन शक्तिपीठं असलेल्या देवीच्या मंदिरामध्ये गर्दी करतात तर गुजरात मध्ये गरबा, दांडिया यांचं विशेष आकर्षण असतं. पश्चिम बंगाल मध्ये याच नवरात्री मध्ये दुर्गापूजा साजरी केली जाते. मा कालीची पूजा करण्याची पद्धत आहे. मग अशा या स्त्री शक्तीचा जागर करणार्‍या उत्सवाच्या शुभेच्छा तुमच्या सख्यांना, नातेवाईकांना, आप्तेष्टांना देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रं तुम्ही नक्कीच शेअर करू शकता. WhatsApp Status, Stickers, Images, Wishes, Quotes शेअर करून तुम्ही या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकाल.

नवरात्री मध्ये अजून एक महिलांमध्ये खास आकर्षण असते ते म्हणजे नऊ रात्री आणि नऊ रंगांचं. घटस्थापनेच्या दिवसापासून नवमी पर्यंत प्रत्येक दिवसाचा एक विशिष्ट रंग असतो. महिला या रंगाच्या धर्तीवर सेलिब्रेशन करतात. यामागे कोणतीही धार्मिक प्रथा नसली तरीही महिलांमध्ये एकता निर्माण करण्याची भावना यामध्ये आहे त्यामुळे महिला वर्गामध्ये या नऊ रात्री नऊ रंगांचं विशेष महत्त्व आहे.  Navratri 2023 Invitation Card Format in Marathi: शारदीय नवरात्री निमित्त WhatsApp Messages, Images द्वारे मित्रमंडळींना द्या भोंडला ते 'माता की चौकी'चं आमंत्रण .

नवरात्रीच्या शुभेच्छा

नवरात्री । File Images

नवा दीप उजळो,

नवी फुल उमलोत,

नित्य नवी बहार येवो,

नवरात्रीच्या या शुभ दिवशी तुम्हावर

देवीचा आशिर्वाद राहो,

शुभ नवरात्री

नवरात्री । File Images

लक्ष्मीचा हात असो

सरस्वतीची साथ असो

गणपतीचा वास असो

आणि मां दुर्गेचा आशिर्वाद असो

नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा

नवरात्री । File Images

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

नवरात्र उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!

नवरात्री । File Images

नारी तू नारायणी, नारी तू सबला

तुझ्या तेजाने उजळे सृष्टी,

नमितो आम्ही तुजला

शुभ नवरात्री!

नवरात्री । File Images

देवी आई वरदान दे

फक्त थोडं प्रेम दे

तुझ्या चरणी आहे सर्वकाही

फक्त तुझा आशिर्वाद दे

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

नवरात्रीमध्ये देवीचा जागर करण्यासाठी देशाच्या काना कोपर्‍यात विविध रीती परंपरा आहे. यामध्ये गरबा, रास दांडिया खेळून देखील रात्र जागवली जाते. देवीसमोर खास अंदाजात यामध्ये नृत्य केलं जातं. महाराष्ट्र, गुजरात मध्ये महत्त्वाच्या शहरात या निमित्ताने भव्य गरबा नाईट्सचं आयोजन केले जातं. नवरात्रीचे नऊ दिवस सारी तरूणाई सेलिब्रेशनच्या माहोल मध्ये असते. देवीचं दर्शन घेत तिचा जागर करण्यासोबतच समाजात महिलांचं महत्त्व देखिल अधोरेखित केलं जातं.