Navratri 2023 Colours for 9 Days: नवरात्री मध्ये यंदा घटस्थापनेपासून नवमी पर्यंत पहा कोणत्या दिवशी कोणता रंग?
Shardiya Navratri 2023 (PC - File Image)

Navratri 2023 9 Days 9 Colours : नवरात्री (Navaratri)  मध्ये नऊ दिवस नऊ रंगांची एक वेगळीच मज्जा असते. नवरात्रीच्या या नऊ रंगांना परिधान करण्यामागे ठोस धार्मिक कारण नाही. पण नवशक्तीचा, स्त्री शक्तीचा जागर करण्याचा हा सण असल्याने महिलांमध्ये एकजुटतेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने नऊ रंग नऊ दिवस ही कल्पना पुढे आली आहे. अनेक स्त्रिया या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये एकाच रंगामध्ये सजण्यासाठी खास प्लॅनिंग करतात. नऊ दिवसांच्या नऊ साड्या, ड्रेस यांची आधीच प्लॅनिंग करून ठेवतात. अनेक सार्वजनिक मंडळांमध्ये देवीची पूजा आणि  सजावट देखील याच नऊ रंगांमध्ये केली जाते. मग तुम्हांलाही आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रीच्या तयारीला लागायचं असेल तर पहा यंदा नवरात्री मध्ये कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करायचा आहे?

नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीच्या पूजेसोबतच गरबा खेळण्याचा देखील एक वेगळा आनंद असतो. त्यामध्ये रास गरबा, दांडिया याचं भव्य स्वरूपात आयोजन केले जाते. महाराष्ट्रात नवरात्री मध्ये भोंडला देखील खेळण्याची पद्धत आहे. यानिमित्त सारे जण एकत्र जमून सणाची मज्जा लुटतात. Navratri 2023 Invitation Card Format in Marathi: शारदीय नवरात्री निमित्त WhatsApp Messages, Images द्वारे मित्रमंडळींना द्या भोंडला ते 'माता की चौकी'चं आमंत्रण .

नवरात्री 2023 मध्ये नऊ रंग कोणते?

प्रतिपदा पहिला दिवस - 15 ऑक्टोबर - नारंगी

द्वितीया दुसरा दिवस - 16 ऑक्टोबर- पांढरा

तृतीया तिसरा दिवस - 17 ऑक्टोबर- लाल

चतुर्थी चौथा दिवस - 18 ऑक्टोबर - रॉयल ब्लू

पंचमी पाचवा दिवस - 19 ऑक्टोबर - पिवळा

षष्ठी सहावा दिवस - 20 ऑक्टोबर - हिरवा

सप्तमी सातवा दिवस - 21 ऑक्टोबर - राखाडी

अष्टमी आठवा दिवस - 22 ऑक्टोबर - जांभळा

नवमी नववा दिवस - 23 ऑक्टोबर - मोरपिसी

आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस नवरात्रोत्सव साजरा केला जातो. घटस्थापनेपासून या सणाला सुरूवात होते आणि दसरा अर्थात विजया दशमी दहाव्या दिवशी साजरी करून या नवरात्र उत्सवाची सांगता केली जाते. या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्याची पद्धत आहे. घटस्थापनेला देवी आणि घट बसवल्यानंतर या नवरात्रीमध्ये ललिता पंचमी साजरी केली जाते. अष्टमीला कन्यापूजन केले जातं. यानिमित्ताने कुमारिकांचं पूजन करण्याची पद्धत आहे.  महिलांना देखील हळदी कुंकू देऊन त्यांच्यामधील आदिशक्क्तीला पुजण्याची पद्धत आहे.