चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा (Gudi Padwa) आणि हिंदू नववर्षाची सुरुवात. या दिवशी घरोघरी गुढी उभारून त्याची साग्रसंगीत पूजा केली जाते. गुढी हे आपल्या आनंदाचे, यशाचे, आरोग्याचे, संपन्नतेचे आणि समाधानाचे प्रतिक मानले जाते. गुढीपाडव्या दिवशी सकाळी लवकर उठून नवे कोरे कपडे घालून घरातील सर्व लहान थोर मंडळी एकत्र येऊन गुढी उभारतात. त्यानंतर कडूलिंब-खडीसाखरेचा प्रसाद खालला जातो. गुढीपाडव्याला 'कडूलिंब' खाण्याचे महत्त्व काय?
गुढी उभारण्याची शुभ वेळ:
चैत्र शुद्ध प्रतिपदा तिथीचा प्रारंभ 5 एप्रिल रात्री 11.50 मिनिटांनी सुरु होत आहे. तर समाप्ती 6 एप्रिल दुपारी 12.53 मिनिटांनी होणार आहे. गुढीपाडव्या निमित्त पूजा विधी कशी करावी आणि महत्व, जाणून घ्या
हिंदू नववर्ष:
चैत्र शुद्ध प्रतिपदेपासूनच हिंदू नववर्षाला आरंभ होतो. हा मराठमोळा सण मुंबई, पुणे यांच्यासह महाराष्ट्रातील विविध भागात पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी शोभायात्रेचे आयोजन केले जाते. या शोभायात्रेत लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण अगदी उत्साहाने सहभाग घेत नववर्षाचे स्वागत करतात. पारंपारिक पोशाख करुन, स्त्रिया अगदी साजशृगांर करुन शोभायात्रेत सहभागी होतात. यात रांगोळ्या, रॅली, ढोलताशा पथकं, लेझीम यांची रेलचेल पाहायला मिळते. या मराठमोठ्या सणाचा उत्साह अनुभवण्यासाठी एकदा तरी शोभायात्रेत अवश्य सहभाग घ्या. गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं!
महाराष्ट्रासोबतच आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्येही पाडवा 'उगादी', 'चेटी चांद' या वेगळ्या नावांनी आणि पद्धतींनी मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.