Mumbai, Pune, Nashik Gudi Padwa Shobha Yatra, Swagat Yatra 2019 : गुढीपाडवा (Gudi Padwa) हा साडेतीन मुहूर्तांंपैकी एक दिवस महराष्ट्रामध्ये हिंदू नववर्षाची (Hindu New Year) सुरूवात म्हणून साजरा केला जातो. यंदा 6 एप्रिल 2019 दिवशी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. मुंंबई,पुणे सारख्या मेट्रोपोलिटन शहरांमध्ये पारंपारिक पद्धतीसोबतच गुढीपाडवा शालिवाहन शकवर्ष १९४१ ची यादिवशी सुरूवात होणार आहे. साजरा करताना शोभायात्रा (Shobha Yatra), स्वागतयात्रा (Swagat Yatra) यांचं आयोजन केलंं जातं. यादरम्यान आबालवृद्ध पारंपारिक पोशाखात गुढीपाडव्याचा आनंद द्विगुणित करतात. तरुणमंडळी ढोल-ताशाच्या गजरात नववर्षाचं स्वागत करतात. मुंबई, पुणे,नाशिक,कोल्हापुरासह देशा परदेशात शोभायात्रांचं आयोजन केले जातंं मग पहा मुंबईमध्ये तुम्ही कुठे शोभायात्रा, स्वागतयात्रेमध्ये सहभागी होऊ शकतात. पारंपरिक पद्धतीने साजऱ्या होणारा यंदाचा गुढी पाडवा कधी आणि शुभ मुहर्त याबद्दल अधिक जाणून घ्या
-
डोंबिवली
डोंबिवली शहरापासून शोभायात्राचं आयोजन सुरू झाले असे समजले जाते. हळूहळू हे लोण इतरत्र पोहचलं. डोंबिवलीमध्ये यंदा शोभायात्रा आयोजनाचं वे वर्ष आहे. भारतीय सैनिकांच्या शौर्याला मानवंदना या थीमवर यंदा डोंबिवली शोभायात्रा आयोजित केली आहे. सकाळी 6.30 वाजता भागशाळा मैदान डोंबिवली येथून शोभायात्रा सुरू होईल. तर समारोप अप्पा दातार चौक येथे होईल. यंदा हे 21 वं वर्ष आहे.
-
ठाणे
ठाणे शहरामध्ये कडून गुढीपाडवा स्वागतयात्रेचं आयोजन केलं जातं. यंदा सकाळी वाजल्यापासून शोभायात्रेला सुरूवात होणार आहे.कौपीनेश्वर मंदिरामध्ये पालखी निघेल. सुमारे ५० चित्ररथ, हजारो युवा युवती, बाल आणि ज्येष्ठ, निरनिराळ्या सामाजिक संस्था, मंदिरं अशा सर्वांचा पारंपरिक वेशात आणि उत्साहात सहभाग असणार आहे. कळवा, खरिगाव, ब्रह्मांड, वागळे इस्टेट, कासारवडवली, ऋतू इनक्लेव या ठिकाणीही यात्रा आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
-
गिरगाव
गिरगावची शोभायात्रा अनेक कारणांसाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. स्थानिक लोकांंपासून ते अगदी मराठी कलाकारांची उपस्थिती या शोभायात्रेमध्ये असते. सकाळी आठ वाजता फडके गणेश मंदीर येथून शोभायात्रेला सुरूवात होणार आहे. Gudi Padwa Shobha Yatra 2019: गिरगाव गुढीपाडवा 2019 चं सेलिब्रेशन कसं रंगणार? 29 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान होणार्या कार्यक्रमांची यादी
-
लालबाग
लालबाग परळ भागामध्ये स्वामी समर्थ मठ ते चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दरम्यान शोभायात्रा आयोजित केली आहे. ही शोभायात्रा सकाळी सात वाजता सुरू होईल.
-
कोल्हापूर
करवीर गर्जना ढोल पथक, कोल्हापूर यांच्याकडून यंदा हिंदू नववर्ष स्वागतयात्रा, शोभायात्रा 2019चं आयोजन करण्यात आलं आहे.'यदा वंदते भारतदेशा तदा प्रराक्रमे वायू जल भूसेना' या संकल्पनेवर ही शोभायात्रा रंगणार आहे. या शोभायात्रेमध्ये भारतीय सैन्यदलावर आधारित चित्ररथ,छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची प्रतिकृती, मर्दानी खेळ प्रात्यक्षिक,यात्रेच्या प्रमुख मार्गांवर रांगोळीची आरास अशी अनेक आकर्षण असणार आहेत. 6 एप्रिल दिवशी सकाळी 9 वाजता मिरजकर तिकटी ते भवानी मंडप, कोल्हापूर या मार्गावर शोभायात्रा रंगणार आहे.
- पुणे
सांस्कृतिक नगरी पुणेदेखील यंदा गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा आणि स्वागत यात्रांनी सजणार आहे. पुण्यात शनिवारवाडा, श्रीमंत दगडूशेठ गणपती आणि लक्ष्मी रोड परिसरात शोभायात्रांचं आयोजन करण्यात येणार आहे. यासोबतीने पुण्यामध्ये यंदा प्राईड रॅलीचंही आयोजन करण्यात आलं आहे.
- नाशिक
नाशिकमध्ये यंदा नववर्ष स्वागत यात्रा समिती नाशिक यांच्याकडून भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महारांगोळी, वादन यांच्यासोबतच तरूण मंडळी एकत्र येऊन जल्लोषात शोभायात्रा, स्वागतयात्रांमध्ये सहभागी होणार आहे. पाडवा पटांगण गोदा घाट येथे या स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबईतील या प्रमुख शोभा यात्रांंसोबतच आता अनेक अनेक ठिकाणी सांस्कृतिक मंडळांद्वारा गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रा, रॅली यांचं आयोजन केले जाते. घरोघरी गुढी उभारून नववर्षाचं स्वागत केलं जातं. मात्र तरूणाईचा जल्लोष पहायचा असेल तर यंदा तुमच्या जवळच्या एका शोभायात्रेला नक्की भेट दया.