Gudi Padwa 2019: पारंपरिक पद्धतीने साजऱ्या होणारा यंदाचा गुढी पाडवा कधी आणि शुभ मुहर्त याबद्दल अधिक जाणून घ्या
Gudi Padwa (Photo Credits- Facebook)

Gudi Padwa 2019: गुढी पाडव्याचा सण हा अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. पाडवा महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि गोव्यासह दक्षिण भारतातील राज्यात चैत्र मासच्या शुक्ल प्रतिपदा या दिवशी साजरा केला जातो. यंदाचा गुढीपाडव्याचा सण 6 एप्रिल, 2019 रोजी साजरा करण्यात येणार आहे. हिंदू पंचांगानुसार, या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते. त्याचसोबत हिंदू धर्मात पाडव्याच्या सणाबद्दल अनेक रुढी आणि परंपरा आहेत. गुढीमधील ध्वजाचा अर्थ झंड आणि पाडव्याला प्रतिपदा तिथीच्या रुपाने साजरा केला जातो. पाडव्याबद्दल लोक कथांनुसार या दिवशी भगवान ब्रम्हा यांनी सृष्टीची निर्मिती केली असल्याचे मानले जाते.

या दिवशी येणाऱ्या गुढीपाडव्यासाठी शुभ मुहूर्त प्रतिपदा तिथी प्रारंभ 5 एप्रिल 2019 ला 11.50 असून त्याची समाप्ती 6 एप्रिल 2019 ला 12.53 मिनिटांनी होणार आहे. तसेच या दिवशी लोक सकाळी लवकर उठून घरातबाहेर सफेद रंगाची रांगोळी, तोरण लावून घराला सजवतात. त्याचसोबत घरात गुढी उभारली जाते. गुढी हे विजयाचे प्रतीक मानले जात असल्याचे म्हटले जाते. एका भांड्यावर स्वतिकचे चिन्ह काढून त्यावर रेशमी कापडसह गुढी उभारली जाते. तसेच घरातील मंडळी पारंपरिक पोशाखात गुढीपाडव्याचा सण साजरा करतात. या दिवशी सुंदरकांड, रारक्षास्रोत्र, देवी भगवती यांच्या नावाच्या मंत्रांचा जाप केला जातो.

दक्षिण भारतामधील आंध्र प्रदेशात, कर्नाटक आणि महाराष्ट्रात पाडव्याचा सण अतिउत्साहात साजरा केला जातो. उत्तम धान्य आणि घरात सुखसमृद्धी नांदण्यासाठी या दिवसाला फार महत्व दिले जाते. तसेच पाडव्याला पुरण पोळीचा नैवेद्य खास मानला जातो.