भाद्रपद मासात येणाऱ्या गणेशोत्सवादरम्यान गौरी पूजन (Gauri Pujan) केले जाते. यावेळी विवाहित महिला गौरी पूजेचा पाठ तीन दिवस साजरा करतात. भाद्रपद शुक्ल पष्ठीला जेष्ठा गौरीचे आवाहन केले जाते. दुसऱ्या दिवशी पूजन आणि नैवेद्य दाखवला जातो आणि तिसऱ्या दिवशी सात दिवसांच्या गणपतींसोबत गौरीचे विसर्जन करण्यात येते. यंदा गौरी आवाहन येत्या 5 सप्टेंबरला असून गौरी पूजन 6 सप्टेंबरला करण्यात येणार आहे.
दुसर्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा केली जाते. सकाळी गौरींची पूजा-आरती करून केलेल्या फराळाचा नैवेद्य दाखवतात. नंतर संध्याकाळी आरती करतात. पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, आंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो. नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी. केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात.महाराष्ट्रात सायंकाळी महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम केला जातो. दर्शनाला आलेल्या महिला व मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्याची पद्धती प्रचलित आहे. परंतु काही समाजात गौरी पूजनावेळी तिखटाचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो.(Gauri Aavahan 2019: गौरी आवाहन करण्यासाठी जाणून घ्या तारीख, वेळ आणि पुजा विधी)
गौरी पूजनाची वेळ आणि तारीख:
>गौरी पूजनाची तारीख: 6 सप्टेंबर (शुक्रवार)
>>वेळ: सकाळी 06.04 ते संध्याकाळी 06.34 मिनिटे
(Jyeshtha Gauri 2019: गौराईला पेशवाई नऊवारी साडी कशी नेसवाल? Watch Video)
कोकणात गौरी-गणपतीच्या सणांचं कौतुक काही निराळंच आहे. कोकणात गौरी ही सासुरवाशीण असून ती तीन दिवसांसाठी माहेरी येते, या भावनेतून तिची पूजा केली जाते. मराठवाडयात मात्र काहीशी वेगळी पद्धत पाहावयास मिळते. ‘गौरी’ असा उल्लेख न करता तिला ‘महालक्ष्मी’ असं संबोधलं जातं आणि महालक्ष्मीच्या रूपातच तिची पूजा केली जाते.