महाराष्ट्रात गणेशोत्सवाचं एक वैशिष्ट्य म्हणजे गौरी पूजन. गणपती बाप्पाची आई म्हणजे पार्वती हीचे गौरीच्या स्वरूपात गणेशोत्सवाच्या काळात पूजन केले जाते. भाद्रपद शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्राच्या वेळेस गौरी आवाहन केले जाते. तर ज्येष्ठा नक्षत्रावर या गौरीचं पूजन केलं जातं. आणि मूळ नक्षत्रवर गणपती बाप्पा सोबतच गौरीचंही विसर्जन केलं जातं. यंदा 5 सप्टेंबर 2019 दिवशी गौरी आणली जाते दुसर्या दिवशी म्हणजे 6 सप्टेंबरला पूजन आणि 7 सप्टेंबरला गौरी गणपती विसर्जन केले जाणार आहे. पूर्वीच्या काळी केवळ प्रातिनिधिक स्वरूपात गौरी सजवून तिचे पूजन केले जात असे. पण आता गौरी फायबर ते फॉल्डिंगच्या विविध स्वरूपात हाता-पायाची गौरी उपलब्ध. प्रत्येक कुटुंबाच्या पद्धतीनुसार, गौरीला सहावारी, नऊवारी साडी नेसवून सजवलं जातं. मग पहा यंदा गौरीला पेशवाई थाटात सजवण्यासाठी साडी कशी नेसवाल? Gauri Aavahan 2019: गौरी आवाहन करण्यासाठी जाणून घ्या तारीख, वेळ आणि पुजा विधी
गौरीचा एखाद्या बाईप्रमाणे साज शृंगार केला जातो. तिला साडी नेसवून, आभूषणाने सजवून सवाष्ण महिलांकडून पूजन केले जाते. कोकणात गौरीचे ओवसे काढण्याची पद्धत आहे. मग माहेशवाशीन म्हणून आलेल्या गौरीला यंदा थाटामाटात कसं सजवाल? त्यासाठी खास पेशवाई पद्धतीने साडी कशी नेसवाल यासाठी पहा या काही सोप्या पद्धती
महाराष्ट्रात काही ठिकाणी महिला या दिवशी तेरड्याची फांदी आणून तिला गौरीचं रूप मानून तिची पूजा करतात. तर काही ठिकाणी गौरीची एक पिठाची प्रतिमा करतात. गौरी पूजनाच्या दिवशी महिला रात्र जागवून विविध खेळ खेळतात. दुसर्या दिवशी तिची गणपतीसोबत पाठवणी करतात. गौरीचं प्रतिकात्मक विसर्जन करतात.