गणपती विसर्जन (Photo Credits: Wikimedia Commons)

10 सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2021) सुरुवात झाली आहे. पुढचे 10 दिवस घरी बाप्पा विराजमान असतील. असे मानले जाते की या काळात गणपती कैलास पर्वतावरून पृथ्वीवर आपल्या भक्तांना भेटायला येतो. महाराष्ट्रामध्ये हा उत्सवाची मोठी धामधूम पाहायला मिळते. हे दहा दिवस आनंदाने, चैतन्याने भारलेले असतात. हे दहा दिवस गणपतीची प्रार्थना, आरती, नैवेद्य अशा मंगलमय वातावरणामध्ये कसे निघून जातात हे समजतही नाही. त्यानंतर 10 दिवसांनी अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन केले जाते. मात्र अनेक ठिकाणी हे विसर्जना दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस आणि सात दिवसही असते.

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक धार्मिक कार्याचा एक ठराविक मुहूर्त असतो. त्या वेळेत ते कार्य केल्यास ते निर्विघ्न सिद्धीला जाते आणि त्याचे सकारात्मक फळ मिळते असे मानले आहे. त्यामुळे सर्व दिवसांच्या गणेश विसर्जन तारखा व त्या दिवसातील मुहूर्त आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.

दीड दिवसांचा गणपती विसर्जन - 11 सप्टेंबर

बहुतेक लोक दीड दिवसांनी आपल्या गणपतीचे विसर्जन करतात. शहरात ही गोष्ट मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. 11 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जनाची वेळ खालीलप्रमाणे आहे -

  • दुपारचा मुहूर्त (चरा, लाभ, अमृता) - 12:35 ते सायंकाळी 05:12
  • संध्याकाळी मुहूर्त (लाभ) - 06:45 ते 08:12
  • रात्री मुहूर्त (शुभ, अमृता, चरा) - 09:40 ते 02:03
  • 12 सप्टेंबर सकाळी लवकर मुहूर्त (लाभ) - पहाटे 04:58 ते 06:25

3 दिवसीय गणपती विसर्जन- 12 सप्टेंबर

3 दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनासाठी चौघडिया मुहूर्त खालीलप्रमाणे आहे -

  • सकाळी मुहूर्त (चरा, लाभ, अमृता) - 07:58 ते 12:35
  • दुपारी मुहूर्त (शुभ) - 02:07 ते 03:39
  • संध्याकाळ मुहूर्त (शुभ, अमृता, चारा) - 06:44 ते 11:07
  • रात्री मुहूर्त (लाभ) - 02:02 ते 03:30
  • 13 सप्टेंबर सकाळी लवकर मुहूर्त (शुभ) - 04:58 ते 06:26

5 दिवसीय गणपती विसर्जन- 14 सप्टेंबर

गणेशोत्सवामध्ये अनेक छोट्या सोसायट्या एकत्र येऊन त्यांचे स्वतःचे मंडळ उभे करतात. यापैकी बरेच लोक त्यांच्या गणपतीचे विसर्जन 5 किंवा 7 व्या दिवशी करतात. यंदा हा दिवस मंगळवारी येत असल्याने तो अजून शुभ मानला जात आहे. (हेही वाचा: गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात नव्याने जमावबंदी, कलम 144 नाही; अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन)

  • सकाळचा मुहूर्त (चरा, लाभ, अमृता)- 09:30 ते 02:06
  • दुपारी मुहूर्त (शुभ) - 03:38 ते 05:10
  • संध्याकाळ मुहूर्त (लाभ) - 08:10 ते 09:38
  • रात्री मुहूर्त (शुभ, अमृता, चरा) - 11:06 ते 03:30 (15 सप्टेंबर)

7 दिवसीय गणेश विसर्जन- 16 सप्टेंबर

  • सकाळी मुहूर्त (शुभ) - 06:26 ते 07:58
  • सकाळी मुहूर्त (चरा, लाभ, अमृता) - 11:01 ते 03:37
  • दुपारी मुहूर्त (शुभ) - 05:08 ते 06:40
  • संध्याकाळी मुहूर्त (अमृता, चरा) - 06:40 ते 09:37
  • रात्री मुहूर्त (लाभ)  - 12:33 ते 02:02 (17 सप्टेंबर)

अनंत चतुर्दशी विसर्जन - 19 सप्टेंबर

अनंत चतुर्दशी हा गणपती विसर्जनाचा मुख्य दिवस आहे. महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व गणपतींचे याच दिवशी विसर्जन होते.

  • सकाळचा मुहूर्त (चरा, लाभ, अमृता) - 07:58 ते 12:32
  • दुपारी मुहूर्त (शुभ) - 02:03 ते 03:35
  • संध्याकाळी मुहूर्त (शुभ, अमृता, चरा) - 06:37 ते 11:03
  • रात्री मुहूर्त (लाभ) - 02:01 ते 03:30 (20 सप्टेंबर)
  • 20 सप्टेंबर सकाळी लवकर मुहूर्त (शुभ) - 04:58 ते 06:27