Pune (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रामध्ये यंदा गणेशोत्सव सेलिब्रेशन (Ganeshotsav Celebration)  वर सलग दुसर्‍या वर्षी कोरोना संकटाचं सावट आहे. मुंबई (Mumbai) प्रमाणे पुणे (Pune) शहरात देखील यंदा आगामी तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंधांमध्ये नागरिकांना गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पुणे शहरामध्ये यंदा गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) ते अनंत चतुर्दशी (Ananat Chaturdashi)  म्हणजेच 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या दहा दिवसांच्या कालावधी साठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात पुण्यात कलम 144 लागू करण्याचे आदेश आहेत. असे वृत्त समोर आले होते पण हा नव्याने लागू केलेल्या जमावाबंदीचा निर्णय नाही. काही ज्वलनशील पदार्थांच्या बाबत हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण  पुणे शहर पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी दिले आहे. राज्य सरकारच्या नियमावली नुसार पूर्वीप्रमाणे अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन आहे.  प्रार्थनास्थळं बंद ठेवली जाणार आहेत. Mumbai Fresh COVID 19 Guidelines For Ganesh Chaturthi 2021: यंदा मुंबईत घरगुती,सार्वजनिक गणेशोत्सवात 'या' नियमावलीचं असेल गणेशभक्तांवर बंधन.

पुणे शहरात गणेशोत्सवादरम्यान मानाच्या 5 गणपती मंडळांमध्ये विशेष उत्साह असतो. तेथे विधीवत पूजा केली जाते पण यंदा हा सारा कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. पुण्याच्या मानाच्या पाचही गणपती मंडळांनी त्यांच्या बाप्पाचं ऑनलाईन दर्शन घेण्याचं भाविकांना आवाहन केले आहे. नक्की वाचा: Ganeshotsav 2021: लालबागचा राजा ते पुण्याचा दगडूशेठ गणपती, यंदा कोविड 19 संकटाच्या पार्श्वभूमीवर घरबसल्या कुठे घेऊ शकाल बाप्पाचं दर्शन; इथे पहा!

महाराष्ट्रात यंदा देखील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये नागरिकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. तर गणपती मूर्ती घरगुती उत्सवासाठी 2 फूट, सार्वजनिक उत्सवासाठी 4 फूट असणार आहे. गणपतीच्या आगमन, विसर्जन मिरवणूकांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच विसर्जन देखील शक्य असल्यास घरात, नजिकच्या कृत्रिम तलावांमध्ये करण्याचं आवाहन आहे. यामुळे अनावश्यक गर्दी रोखून कोरोना संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे.