Ganeshotsav 2019: गणपती विसर्जनावेळी ठेवा शहराचे रंगरूप अबाधित; प्रत्येकानेच घ्या 'ही' काळजी
प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

आज गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2019) शेवटचा दिवस, गेले 11 दिवस चालू असलेल्या या उत्सवाची सांगता आज गणपती विसर्जनाने (Ganpati Immersion) होत आहे. घरातील गणपती, सार्वजनिक गणपती अशा सर्व बाप्पांचे उद्या संध्याकाळपर्यंत विसर्जन होईल. मोठ्या थाटामाटात हा उत्सव साजरा केला जातो, बाप्पा आले की सर्वांच्याच आनंदाला पारावर उरत नाही. मात्र एकदा का गणेशोत्सव संपला सर्वजण काही घडलेच नाही अशा अविर्भावात आपल्या कामाला सुरुवात करतात. विसर्जन मिरवणुकीनंतर शहराचे बदलेले रंगरूप दिसते, झालेला कचरा, प्रदूषण लक्षात येतो पण आपण इथे कुठे राहतो, याच्याशी आपल्याला काय घेणे देणे असा पवित्रा नागरिक घेतात.

मात्र यावेळी प्रत्येकानेच थोडीशी जबाबदारी उचलली तर फक्त प्रदूषण नाही तर अनेक गोष्टींना आळा बसू शकतो. शहर अगदी कमी वेळात पूर्वपदावर येऊन लोकांचेच जीवन सुकर होऊ शकते.

  • सर्वात महत्वाचे म्हत्वाचे म्हणजे या काळात जमा होणारी फुले, हार, दुर्वा इ. गोष्टी नागरिकांनी आपल्या जवळच्या परिसरातील निर्माल्य कलशात टाकल्या किंवा आपल्या बागेत, कुंडीत पुरल्या तर अशा गोष्टींचे पावित्र्य राखले जाऊन त्याकडे कोणी कचरा म्हणून पाहणार नाही.
  • विसर्जन मिरवणुकीदरम्यान फार मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा कचरा जमा होतो. पुणे-मुंबई सारख्या ठिकाणी तर मिरवणूक दुसऱ्या दिवशी पर्यंत चालते अशा वेळी परिसरातील नागरिकांना या प्लास्टिक कचऱ्याचा त्रास होतो. त्यामुळे पहिल्यांना कुठेही असे प्लास्टिक आढळले तर ते कचऱ्याच्या डब्यात टाका. शक्यतो अशा गोष्टी नाला-गटारात, नदीत जाणार नाहीत याची काळजी घ्या.
  • गणपतींचे विसर्जन शक्यतो प्रशासनाने ठरवून दिलेल्या जागीच करा. त्या ठिकाणी वाहिले जाणारे नारळ, करवंट्या एकत्र करून ठेवल्या तर त्या इतरत्र पसरून त्यांचा कचरा शहरभर होणार नाही. गणपतीसोबत हार, फुले यांचेही विसर्जन करू नये. ते शक्यतो निर्माल्या कलशातच टाकावे.
  • गणपतींच्या मूर्तींचे इतःस्तत विसर्जन केल्याने त्यांना एकत्र करून त्यांचे पावित्र्य राखून त्यांची विल्हेवाट लावणे अवघड ठरते.
  • बाप्पांना निरोप देताना फटाके फोडण्याची गणेश मंडळांत स्पर्धा लागते. त्यातून धूर, धूळ, कचरा आणि कार्बनडाय ऑक्साईड, कार्बन मेनाक्साईड यासारखे विषारी वायू पसरून हवा अधिक प्रदूषित होते. त्यामुळे अशा गोष्टी कटाक्षाने त्याला हव्यात.तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेऊन गणपतींचे विसर्जन केले तर सामाजिक कार्याला नक्कीच हातभार लागेल.