Mahatma Gandhi | Photo Credits : Wikimedia Commons

Gandhi Jayanti 2020: भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या तावडीतून देशाची सुटका करण्यासाठी महात्मा गांधी यांनी मोलाचे कार्य पार पाडले आहे. परंतु या सर्व गोष्टी करताना गांधीजींच्या समोर अनेक आव्हाने सुद्धा उभी होती. तरीही गांधीजी यांनी कधीच हार न मानत त्याला सामोरे जाण्याची जिद्द आणि एकनिष्ठा दाखवत अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने आपले काम सुरुच ठेवले होते. अखेर भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. याच पार्श्वभुमीवर येत्या 2 ऑक्टोंबरला महात्मा गांधी जयंती साजरी केली जाणार आहे. तर फार कमी जणांना माहिती असेल की, महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे आहे. तसेच गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून सुद्धा संबोधले जाते.

महात्मा गांधी यांच्या आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास त्यांचा जन्म 2 ऑक्टोंबर 1869 मध्ये गुजरात मधील पोरबंदर येथे झाला होता. गांधीजी यांना राजकीय नव्हे तर आयुष्यातील विविध पैलूवर त्यांचा उत्तम प्रभाव होता. समाज सुधारक, कुशल अर्थतज्ञ यांच्यासह उत्कृष्ट जनसंपर्क गांधीजी यांच्याकडे होते. तर प्रत्येक वर्षाला 2 ऑक्टोंबर रोजी गांधी जयंती मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी केली जाते. तसेच गांधी जयंती ही राष्ट्रीय सणांपैकी एक मानली जाते. तर गांधी जयंती निमित्त बापूंच्या आयुष्यातील काही खास गोष्टींबद्दल येथे जाणून घ्या.(Gandhi Jayanti 2020 Virtual celebration Ideas: कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर यंदा व्हर्च्युअल जगात गांधी जयंती कशी साजरी कराल?)

महात्मा गांधी यांनी आपल्या आयुष्यात 3 महत्वपूर्ण सुत्रांच्या आधारावर आयुष्य जगण्याचे ठरविले होते. तसेच या सुत्रांमुळेच त्यांना राष्ट्रपिता म्हणून ही संबोधले गेले.  पहिले सुत्र म्हणजे सामाजातील घाण साफ करणे. यासाठी गांधीजी यांनी झाडूचा आधार घेतला होता. त्यानंतर दुसरे सुत्र म्हणजे सामूहिक प्रार्थनेला बळ देणे. त्यामुळे एकजुटीने लोक जात-पात आणि धर्म न पाहता देवाची प्रार्थना करतील. तिसरे आणि महत्वपूर्ण सुत्र असे होती की, चरखा. तो गांधीजींचा आत्मनिर्भर आणि एकतेचे प्रतीक मानले जाते. गांधीजींच्या याच तीन महत्वपूर्ण सुत्रांमुळे त्यांना राष्ट्रपिता म्हणून सर्वजण ओळखू लागले होते.

महात्मा गांधी यांनी 1909 मध्ये  हिन्द स्वराज्य नावाचे एक पुस्तक लिहिले होते. या पुस्तकात गांधीजींनी त्यांचे राजकीय जीवनाचा उल्लेख केला होता. त्याचसोबत आयुष्यातील महत्वाच्या गोष्टींची नोंद सुद्धा या पुस्तकात करण्यात आलेली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी महात्मा गांधीजी यांच्या हिन्द स्वराज्य या पुस्तकावर इंग्रजांकडून बंदी घालण्यात आली होती. (महात्मा गांधी यांना 'राष्ट्रपिता' ही उपाधी कशी मिळाली?)

महात्मा गांधी यांनी खुप ज्ञान संपादन केले होते. तर लंडन येथे कायद्याचा अभ्यास केला होता. येथे बॅरिस्टरची पदवी ही मिळवली. पण आपले आयुष्य देशासाठी गांधीजी यांनी समर्पित केले. देशाच्या स्वातंत्र्यसाठी अनेक सत्याग्रह आणि इंग्रजांच्या गुलमागिरीतून भारताची सुटका करण्यासाठी ही त्यांचे मोठे योगदान असल्याचे आज देश आझाद आहे.