Mahatma Gandhi's 150th Birth Anniversary: यंदा 2 ऑक्टोबर दिवशी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची 150 वी जयंती साजरी केली जाणार आहे. गुजरात येथे महात्मा गांधी म्हणजे मोहनदास करमचंद गांधी (Mohandas Karamchand Gandhi) यांचा जन्म झाला. पुढे देशा-परदेशात कोट्यावधी लोकांचे प्रेरणास्थान असलेले गांधी हे 'भारताचे राष्ट्रपिता'(Father of the Nation) म्हणून ओळखले जातात. जगाला अहिंसेचे धडे देणार्या गांधीजींना नेमकी ही पदवी कधी, कुणी आणि कशी दिली? हे तुम्हांला ठाऊक आहे का?
पेशाने बॅरिस्टर असलेले महात्मा गांधी भारतामध्ये आले. इंग्रंजांविरूद्ध स्वातंत्र्याचा लढा देताना महात्मा गांधींजींनी जगाला 'अहिंसे'चा मार्ग दाखवला. त्यामुळे जगाला त्यांनी शांततेचे धडे दिले. गांधींजींना 'महात्मा' किंवा 'राष्ट्रपिता' या नावाने ओळखले जात असले तरीही त्यांना मिळालेल्या या उपाधी ही भारतीय सरकार कडून मिळालेली अधिकृत प्रकारची उपाधी नव्हे. Mahatma Gandhi 150th Birth Anniversary: महात्मा गांधी यांच्याविषयी 10 अचंबित करणा-या गोष्टी
'राष्ट्रपिता' या उपाधी बद्दल इतिहास काय सांगतो?
लहानपणापासून गांधींजींच्या नावापुढे 'महात्मा' ही उपाधी आहे. सारे भारतीय आदराने गांधीजींचा उल्लेख हा 'राष्ट्रपिता' म्हणूनच करतात. पण संविधानामध्ये तसा कोणताही विशेष उल्लेख नाही. केवळ भारतीयांच्या प्रेमापोटी त्यांना या उपधी बहाल करण्यात आल्या आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 'भारतीय संविधानाचे जनक' संबोधले जात होते.
महात्मा गांधींजींना ' राष्ट्रपिता' कोणी संबोधित केले?
इतिहासामध्ये सापडलेल्या काही नोंदींनुसार, महात्मा गांधींजींचा प्रथम 'राष्ट्रपिता' हा उल्लेख सुभाषचंद्र बोस यांनी केला आहे. सिंगापूरमध्ये 1944 साली एक मुलाखत देताना महात्मा गांधी यांचा उल्लेख 'राष्ट्रपिता' म्हणून केला होता. सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधीजींच्या 'दांडी मार्च' आणि ; भारत छोडो मोहिमे'ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर त्यांचा कौतुकाने 'राष्ट्रपिता' असा उल्लेख केला. हळूहळू सामान्यांनी गांधीजींचा उल्लेख 'राष्ट्रपिता' असा करायला सुरूवात केली.
गांधीजींचा उल्लेख 'महात्मा' किंवा 'राष्ट्रपिता' म्हणून करणं ही राजकीय खेळी आहे का?
1948 साली जवाहरलाल नेहरू यांनी महात्मा गांधी यांच्या निधनानंतर भारताचे 'राष्ट्रपिता' हरपले असा उल्लेख केला. त्यानंतर लोकांनीही ही उपमा उचलून धरली. त्यामुळे जनभावनेसोबत राजकीय पक्षांनीदेखील जाण्याचे ठरल्यानंतर आता राष्ट्रपिता आणि महात्मा गांधी हे समीकरण जुळून आले. आता देशा, परदेशामध्ये नागरिक गांधीजींना 'राष्ट्रपिता' म्हणूनच ओळखतात. आता हीच ओळख कायम राहणार आहे.
महात्मा गांधी यांचे प्रेरणादायी विचार
आज देशामध्ये गांधी जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा गांधींजींच्या जयंती निमित्त स्वच्छ आणि प्लॅस्टिकमुक्त भारत घडवण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत.