Marathi Inspiring Woman (Photo Credits: File Photo)

8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women's Day) म्हणून साजरा केला जातो. जागतिक स्तरावर महिलांच्या सबलीकरणासाठी या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रांगड्या महाराष्ट्रामध्ये जशा पुरूषांच्या पराक्रमाच्या कथा आहेत तशाच प्रेरणादायी महिला देखील आहेत. त्यांच्या कर्तृत्त्वाची दखल जगाला घेणं भाग पडलं आहे. स्वातंत्र्यलढ्यापासून, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ते अगदी आज डिजिटल मिडिया गाजवण्यातही मराठमोळ्या स्त्रिया अग्रेसर आहेत. राणी लक्ष्मीबाईंनी इंग्रजांची सत्ता उलथून लावण्यासाठी बंड पुकारले. रणांगणावर चिमुकल्याला पाठीवर घेऊन लढा दिला. तर डॉ. आनंदीबाई जोशी (Dr. Anadibai Joshi)  या परदेशात जाऊन वैद्यकीय शास्त्राचे शिक्षण घेणारी पहिली महिला भारतीय डॉक्टर होत्या. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक मुलींसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले. केवळ चूल आणि मूल इतका संसार न ठेवता पुढे अनेकींनी शिक्षण घेऊन व्यवसाय, नोकरी केली. पुरूषप्रधान संस्कृतीला छेद देत अनेक महिलांनी नव्या वाटा निवडल्या आणि त्यावर आपलं कोरलं. अशाच काही महिलांचा हा प्रेरणादायी प्रवास. International Women's Day 2019: महिलांना आहेत हे '8' खास अधिकार!

लता मंगेशकर

 

View this post on Instagram

 

Namskar! Mere ek he official account hai or vo @mangeshkar.lata hai. Baki fan account ya fake account hai. Unse bachkar raha.

A post shared by Lata mangeshkar (@mangeshkar.lata) on

भारताची गानकोकिळा म्हणून लता मंगेशकर यांची ओळख आहे. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी घराची जबाबदारी लता मंगेशकर यांच्यावर येऊन पडल्याने त्यांना संगीतसाधनेलाच त्यांचं करियर म्हणून निवडावं लागलं. आई आणि पाच भावंडांची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. संगीत साधनेने त्यांनी जगभर आपल्या आवाजाची मोहिनी घातली. आजही भारतीय संगीत क्षेत्रामध्ये लता मंगेशकर यांच्यासारखी गायिका होणे नाही.. असे आदराने म्हटले जाते. ...असे पडले लता मंगेशकर हे नाव !

आशा भोसले

 

View this post on Instagram

 

Recently did a radio show🎧

A post shared by Asha Bhosle (@asha.bhosle) on

संगीताचा वारसा मंगेशकर कुटुंबीयांकडे असल्याने आशा भोसले यांच्यावर त्याचे संस्कार होणे स्वाभाविक आहे. मात्र केवळ साचेबद्ध भारतीय संगीतामध्ये आशा भोसले कधीच अडकून राहिल्या नाहीत. त्यांनी संगीतातले अनेक प्रकार गायनातून दाखवले आणि लोकप्रिय केले. भारतापलिकडे ब्रेट ली सारख्या क्रिकेटपटूसोबत  असो किंवा Boy George, Stephen Lauscombe या गायकांसोबतही गाणी रेकॉर्ड केली आहेत.  विविध भाषांमध्ये गाणी गाण्याचा विश्वविक्रम आशा भोसले यांच्या नावावर आहे.

डॉ. आनंदीबाई जोशी

 

View this post on Instagram

 

#DrAnandibaiJoshi The 1st Indian Woman Doctor 🙏

A post shared by Whatsapp Temple (@whatsapptemple) on

परदेशात जाऊन वैद्यकीय शास्त्राचे शिक्षण घेणार्‍या डॉ. आनंदीबाई जोशी या पहिल्या महिला होत्या. ज्या काळात महिलांना घरातही शिक्षण घेण्याची सोय नव्हती अशावेळेस 1885 साली डॉ. आनंदीबाई जोशी यांनी मिशनरी स्कूलमध्ये इंग्रजीमध्ये शिक्षण घेतले त्यानंतर अमेरिकेत जाऊन वेस्टर्न मेडिकल सायन्सचे शिक्षण घेतले. भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनाला कलाटणी देणारे '7' क्षण

स्मृति मानधना

क्रिकेट हा खेळ अजूनही पुरूषांचा खेळ म्हणून पाहिला जातो. परंतू भारताच्या क्रिकेट संघात स्मृति मानधना या खेळाडूने अव्वल स्थान कमावलं. ICC च्या यादीमध्ये स्मृती ही मराठमोळी मुलगी अव्वलस्थानी आहे. आता स्मृति भारतीय क्रिकेट संघाची कर्णधारपदापर्यंत पोहचली आहे.

सिंधुताई सपकाळ

 

 

View this post on Instagram

 

#sindhutaisapkal#womenpower #greatpersonality

A post shared by piger_ amhi_sarya (@piger_amhi_sarya) on

अनाथांची माय अशी सिंधुताईंची ओळख आहे. स्वतःच्या आयुष्यामध्ये अनेक कठीण प्रसंगाचा सामना करून देखील त्यांनी समाजातील अनाथांना आसरा देण्याचा पर्याय निवडला. मदर ग्लोबल फाउंडेशन संस्थेची स्थापना करून अनाथांसाठी त्यांनी आपल्या घराची दारं उघडली आहेत.

मंदा आमटे

 

View this post on Instagram

 

The duo is very fond of each other :) It definitely takes a lot of courage to even begin something so radical, so true as Lok Biradari Prakalp. Their names are never taken singly. Its never 'Work by Prakash' or 'Sacrifice by Manda' its always 'प्रकाश व मन्दाचे कार्य' Mandakini Amte: We met in medical college, in Nagpur. Prakash had told me he wanted to serve mankind and I promised to be by his side. I didn't know what it was to live in a forest then. Prakash Amte: When almost everyone in our friends' circle had plans to go abroad, it was difficult to forgo the lure. She did it happily. Being together makes everything balanced.

A post shared by Prakash & Manda Amte's FanClub (@amte_hemalkasa) on

आमटे कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा सक्षमपणे पुढे चालवण्यासाठी प्रकाश आमटेसोबत काम करणार्‍या त्यांच्या सहचारिणी म्हणी मंदा आमटे. मंदा आमटे स्वतः डॉक्टर आहेत. कुष्ठरोगींसोबतच समाजातील दुर्बल घटकांवर औषधोपचार करण्यामध्ये मंदा आमटे यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचा 'मॅगसेसे पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला आहे. महाराष्ट्रासोबतच त्यांनी आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेशमध्येही मोलाची कामगिरी केली आहे.

प्राजक्ता कोळी

युट्युब हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नव्हे तर त्याचा वापर समाजात काही प्रबोधनपर गोष्टी पोहचवण्यासाठी थोड्या हटके स्टाईलने पोहचवणारी मराठमोळी युट्युबर म्हणून प्राजक्ता कोळीची ओळख आहे. अवघ्या 25 वर्षाच्या प्राजक्ता कोळीने फोर्ब्सच्या यादीमध्ये 'यंग अचिव्हर्स' यादीमध्ये नाव बनवलं, जगभरातून भारताचं प्रतिनिधित्त्व UN मध्ये करणारी युट्युबर म्हणून प्राजक्ता कोळीची ओळख आहे. 'मोस्टली सेन' या तिच्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून विनोदीवीर म्हणून काम करते.