Anandi Gopal Joshi (Photo Credits: commons.wikimedia.org)

Dr. Anandibai Joshi Death Anniversary: आनंदीबाई जोशी (Aanadibai Joshi) या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर (India's First Female Doctor) आहेत. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी क्षयरोगाने (TB) त्यांना गाठलं. आजारपणाशी लढा देतादेता 26 फेब्रुवारी 1887 साली आनंदीबाई यांचे निधन झाले. अमेरिकेच्या येथून त्यांनी वैद्यकशास्त्राची पदवी मिळवली. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात त्यांचं कौतुक झालं. ' जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिए' या गोष्टीचा पुन्हा पुन्हा प्रत्यय आनंदीबाईचं आयुष्य पाहून येईल. यमुना ते डॉ आनंदीबाई जोशी हा प्रवास पहा कसा घडला.

आनंदीबाई जोशी यांच्या जीवनाला या क्षणांनी  मोठी कलाटणी दिली

  • 9 व्या वर्षी लग्न

यमुना हे आनंदीबाईचे माहेरचे नाव. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने मुलीच्या भावी आयुष्याचा विचार करता यांनी तिचं लग्न करण्याचा निर्णय घेतला. सरकारी नोकरीत असलेला पण तब्बल 20 वर्ष मोठ्या बिजवर गोपाळ जोशी यांच्या सोबत त्यांचा विवाह झाला आणि यमुना आनंदी जोशी झाली. गोपाळराव जोशी यांचा हट्ट होता की त्यांच्या पत्नीला शिक्षण आणि इंग्रजी भाषा ही यायलाच पाहिजे. त्यासाठी जितकी मेहनत आनंदीबाईंनी घेतली. तितकीच मेहनत गोपाळरावांनीही घेतले. प्रसंगी रागाच्या भरात मारहाणही केली.

  • कोल्हापूर भेट आणि मुलींची शाळा

गोपाळरावांनी आनंदीबाईंना प्राथमिक शिक्षण दिले होते मात्र शालेय शिक्षणाची गरज ओळखून त्यांनी आनंदीबाईंना शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूरला खास मुलीची शाळा आहे हे गोपाळरावांना समजलं तेव्हा त्यांनी स्वतःची बदली कोल्हापूरला करून घेतली आणि इंग्रजी मिशनरी स्कुलमध्ये आनंदीबाईंचे शिक्षण सुरु झाले. वर पाहता सुंदर वाटणारा प्रवास त्यांच्यासाठी खडतर होता. ख्रिस्ती मुली आनंदीबाईंना हीन वागणूक देत असत. मात्र अशा परिस्थितीतही त्या कणखर राहिल्या. एकीकडे रूढीवादी हिंदू आणि दुसरीकडे ख्रिस्ती सह विद्यार्थिनी यांच्या कडून होणारा त्रास त्यांच्या संयमाची परीक्षा पाहत होता.

  • 14व्या वर्षी बाळ गमावण

मातृत्व स्त्रीच्या जन्माला पूर्णत्व देते. अशातच नवजात बाळाचा काही दिवसात मृत्यू होणं या घटनेने आनंदीबाई हडबडल्या. वेळीच लक्षणं न समजल्याने उपचार देता न आल्याने चिमुकल्या जीवाचा मृत्यू होणं ही गोष्ट दुर्दैवी होती. पण याच घटनेने आनंदीबाईंना केवळ शिक्षण नाही तर डॉक्टर होऊन रुग्णांची सेवा करण्याची प्रेरणा दिली. यानंतर आनंदीबाईंचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.

  • परदेशी शिक्षण

अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शिक्षण घेणे हे सोपे नव्हते सुरुवातीला आनंदीबाईंना यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारावा लागेल असे सांगण्यात आले. मात्र काहीही झालं तरी डॉक्टर ही पदवी आनंदीबाई जोशी या हिंदू नावापुढेच लागेल या निर्णयावर त्या ठाम होत्या. महाराष्ट्रात विविध ठिकाणी शिक्षण घेतल्यानंतर बंगालमध्ये कॉलेजमध्ये त्यांनी काही धडे गिरवले.

  • कार्पेंटर बाईचं आयुष्यात येणं

Law Of Attraction ची किमया काय असते हे तुम्हांला आनंदीबाईंचं आयुष्य पाहून समजेल. एकीकडे गोपाळरावांची सरकारी नोकरी गेली होती. ख्रिस्ती धर्म न स्विकारता परदेशी शिक्षण घेण्याची शक्यता धूसर होती. मात्र अशातच अमेरिकेतून कार्पेंटर बाईचं पत्र आलं. आनंदीबाईंची शिक्षणाप्रती ओढ पाहून केवळ मासिकातील छापील पत्र पाहून अमेरिकेत शिक्षणाचा खर्च, राहण्याची सोय यांसाठी यांनी तयारी दाखवली.  Woman's Medical College of Pennsylvania

मध्ये त्यांनी शिक्षण घेतलं.

  • पदवीदान सोहळा

अमेरिकेमध्ये वैद्यशास्त्राची पदवी मिळवणार्‍या आनंदीबाई या पहिल्या भारतीय महिला होत्या. त्यांचं कौतुक अमेरिका, भारतमध्ये झालंच मात्र त्यासोबत लंडनची राणी व्हिक्टोरिया यांनीदेखील आनंदीबाईचं कौतुक केलं होतं.

  • कोल्हापुरात महिला विभागाच्या प्रमुखअमेरिकेत असतानाच आनंदीबाईंना क्षयरोगाचं निदान झालं होतं. दरम्यान भारतामध्ये परतल्यानंतर आनंदीबाईंवर कोल्हापुरच्या   Albert Edward Hospital  हॉस्पिटलमध्ये त्यांची नियुक्ती झाली.  physician-in-charge म्हणून त्यांची नेमणूक झाली. पण वर्षभरात त्यांचं निधन झाले.

 

आनंदीबाईंच्या पार्थिवाची राख अमेरिकेत पाठवण्यात आली. कार्पेंटर कुटुंबीयांनी अमेरिकेत डॉ. आनंदीबाईंची खास स्मशानभूमी बनवली आहे. वयाच्या अवघ्या 21 वर्षी डॉ. आनंदीबाई जोशी यांनी जगाचा निरोप घेतला. मात्र इच्छाशक्तीच्या बळावर आपण काहीही मिळवू शकतो, त्याला वयाचं बंधन नसतं अशी शिकवण डॉ. आनंदीबाई जोशी यांनी दिली.