महाराष्ट्राची स्मृती मंधाना महिला क्रिकेटपटूंच्या ICC क्रमवारीत अव्वल
Smriti Mandhana (Photo Credits: Twitter)

मराठमोळ्या स्मृती मंधाना(Smriti Mandhana) या महिला क्रिकेटपटूने आयसीसी क्रमवारीमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या महिला क्रिकेट संघाने नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेमध्ये 2-1 अशी आघाडी मिळवली होती. स्मृती या मालिकेची 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' ठरली होती. खेळातील सातत्यामुळे स्मृतीला आयसीसी कर्मवारीमध्ये अव्वल स्थान मिळवण्याचा मार्ग सुकर झाला. स्मृती भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर आहे. India Vs New Zealand Womens ODI: भारतीय महिला संघाचा मालिका विजय; स्मृति मंधाना ठरली Player Of The Tournament

 

स्मृतीने 2018 पासून आतापर्यंत 15 एकदिवसीय सामन्यांत दोन शतकं आणि 8 अर्धशतकं झळकावली. आयसीसीच्या क्रमवारीत स्मृतीने ( 751) 70 गुणांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरीला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू मेग लॅनिंग 76 गुणांच्या पिछाडीसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज पाचव्या स्थानावर आहे.