India Vs New Zealand Womens ODI: भारतीय महिला संघाचा मालिका विजय; स्मृति मंधाना ठरली Player Of The Tournament
Smriti Mandhana (Photo Credit: Facebook)

India Vs New Zealand Womens ODI 2019: भारत विरुद्ध न्युझीलंड महिला क्रिकेट संघाच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मान भारताच्या स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) फटकावला आहे. तिचा 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' (Player Of The Tournament) चा किताब देवून गौरव करण्यात आला. तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून एना पीटरसन (Anna Peterson) हीला 'प्लेअर ऑफ द मॅच'चा (Player Of The Match) किताब मिळाला.

भारत विरुद्ध न्युझीलंड महिला क्रिकेट संघात झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्युझीलंडने 8 विकेट्सने भारतावर विजय मिळवला. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेत मालिका जिंकली. (India Vs New Zealand Womens ODI: 'स्मृती मंधाना'ची शतकी खेळी; भारतीय महिला संघाचा दमदार विजय)

न्युझीलंडच्या सुजी बेट्स आणि कर्णधार एमी स्टाथवेटे हिने अर्धशतक झळकावले. सुजीने 57 तर एमीने 66 धावांची खेळी केली. याशिवाय लॉरेन डाऊन 10 तर सोफी डेविनेने 17 धावांचे योगदान दिले.

भारतीय संघातील दीप्ती शर्माने शानदार अर्धशतक झळकावले. त्यानंतर हरमनप्रीत कौरने 24, जेम्मिाह रोड्रिगेज 12, डी. हेमलता 13 झुलन गोस्वामी हिने 12 धावांचे योगदान देत न्युझीलंडपुढे 150 धावांचे लक्ष्य ठेवले. हे लक्ष्य सहज साध्य न्युझीलंडने भारतावर 8 विकेट्सने विजय मिळवला.

भारतीय महिला क्रिकेट संघाने यापूर्वी झालेल्या दोन सामन्यापैकी पहिल्या सामन्यात न्युझीलंडचा 9 विकेट आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 8 विकेट्सने पराभव केला होता. मात्र शेवटच्या सामन्यात भारतीय महिला संघाला पराभव पत्करावा लागला.