दिवाळीत (Diwali 2019) येणाऱ्या कार्तिक शुद्ध प्रतिपदेला 'दिवाळी पाडवा' (Diwali Padwa) साजरा केला जातो या पाडव्याला 'बलिप्रतिपदा' (Balipratipada) असे ही संबोधले जाते. यंदाच्या दिवाळी वेळापत्रकानुसार दिवाळी पाडवा आज म्हणजेच 28 ऑक्टोबरला साजरा करण्यात येणार आहे. या दिवसाचे वैशिष्ट्य असे की वर्षातील साडेतीन शुभमुहूर्तांपैकी हा शेवटचा अर्धा मुहूर्त आहे. दिवाळी पाडवा हा नवविवाहित दाम्पत्यासाठी विशेष महत्वाचा आहे. यादिवशी पत्नी पतीचे औक्षण करून त्याच्या स्वास्थ्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. सणाचा दिवस हा मुळातच शुभ असतो त्यामुळे साधारणतः सकाळी अभ्यंगस्नान केल्यावर पतीला ओवाळण्याची पद्धत आहे. मात्र या दिनी एक खास मुहूर्त पाळून पतीला ओवाळणी केल्यास जास्त फायदा होऊ शकतो.
Diwali Padva 2019 Messages: दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश,शुभेच्छापत्र
हिंदू पुराणानुसार, पुरुष हे शिवाचे आणि स्त्री हे दुर्गादेवीचे प्रतीक आहे. यामुळे पत्नीमध्ये दुर्गातत्त्व कार्यान्वित होऊन तिने पतीचे औक्षण केल्यानंतर त्याची शक्ती पतीच्या सुप्तावस्थेत असणाऱ्या शिवतत्त्वाला जागृत करते अशी मान्यता आहे. आजच्या या शुभ दिनी चला तर जाणून घेऊयात दिवाळी पाडवा ओवाळणीचा मुहूर्त आणि काही खास नियम
Diwali Padwa 2019: दिवाळी पाडवा का साजरा केला जातो, जाणून घ्या महत्व
दिवाळी पाडवा तिथी: 28 ऑक्टोबर 2019
पाडवा ओवाळणी मुहूर्त : सकाळी 10 ते 11.30 आणि संध्याकाळी 5 ते 7.30
बळी पूजा सायंकाळ मुहूर्त: दुपारी 03:46 पासून ते संध्याकाळी 06:04 पर्यंत
'या' गोष्टींची घ्या खास काळजी
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर पाटील ओवाळताना काही खास गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे आहे. लक्षात घ्या, साधारणतः ओवाळणी करताना पण सोने चांदी या धातूपासून बनलेल्या वस्तूंचा वापर करतो मात्र पाडव्याची ओवाळणी ही केवळ सुपारीने करायची असते. ओवाळणी नंतरचा आणि आधीचा 15 ते 20 मिनिटांचा काळ पती पत्नी दोघांनीही एकत्र राहणे गरजेचे आहे. ओवाळणी नंतर गोडाधोडाचे जेवण पतीला खाऊ घाला.
याशिवाय, दिवाळी पाडवा हा दिन बलिप्रतिपदा म्ह्णून साजरा केला जातो. अत्यंत दानशूर अशा बळीराजाला भगवान विष्णूने बटुवेशात वामन अवतार घेऊन पाताळात गाडल्याचा हा दिवस आहे. यामुळेच घरोघरी बळीराजाची पूजा केली जाते.