
दिवाळी पाडवा म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा. म्हणजेच बलिप्रतिपदा. हा दिवस संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोणत्याही दाम्पत्यासाठी हा दिवस खास. मुलीच्या माहेरी दिवाळसणासाठी म्हणून जावयांना बोलावले जाते. दाम्पत्य जर नवविवाहित असेल तर दिवाळसण अगदी दणक्यात साजरा केला जातो. पती पत्नीच्या नात्यासाठीचा राखून ठेवलेला हा दिवस. या दिवशी पत्नी पतीचे औक्षण करते. पूर्वीच्या काळी स्त्रिया जेव्हा कामासाठी बाहेर पडल्या नव्हत्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या नव्हत्या, तेव्हा पती आपल्या राबणाऱ्या पत्नीवरच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून ओवाळणीत साडी तिला भेट म्हणून देत असे. पण आता स्त्रियाही सक्षम झाल्या आहेत. त्यांमुळे हल्ली दोघंही एकमेकांना भेटवस्तू देतात. पण या दिवशी वेळात वेळ काढून 2 प्रेमाचे शब्द बोलण्यापेक्षा भारी भेटवस्तू कुठलीच नसावी. त्यासाठीच हे काही रोमँटिक मेसेजेस. (हेही वाचा. Diwali Abhyang Snan 2019 Shubh Muhurat: नरक चतुर्दशीच्या दिवशी ‘हा’ आहे अभ्यंग स्नानाचा मुहूर्त, जाणून घ्या कसे करावे अभ्यंग स्नान)

बंध आपल्या प्रेमाचे असेच वाढत जावो,
सुख आणि आनंद आपल्या आयुष्यात सदैव राहो.

आपल्या आयुष्यात अंधार पडू शकणाऱ्या प्रत्येक पावलावरती,
अशीच पणती होऊन उजळत राहा.

आपल्या नात्यातला गोडवा असाच मुरत जावो,
एखाद्या मुरंब्यासारखा.

आतापर्यंत दिलीस तशीच साथ पुढे सुद्धा दे,
कारण गलबत नसलेलं जहाज कुठेही भरकटू शकतं.

कळीसारखी उमलून बघ रोज नव्याने खुलशील तू,
प्रेमामध्ये न्हाऊन माझ्या फुलाप्रमाणे फ़ुलशील तू.
आपल्या जोडीदाराला अशा छान छान शुभेच्छा देऊन खुश करा. आजच्या या खास दिवसाला अजून खास बनवा. मस्त काहीतरी प्लॅन करा. फिरायला जा. डिनरला जा. एकमेकांसोबत वेळ घालवा. आणि वर्षभरातून एकदा येणारी ही हक्काची संधी हक्काने उपभोगून घ्या. पाडव्याच्या शुभेच्छा!